गोंडपिपरी:
शहरात समलैंगिक अत्याचार झाल्याचे खळबळजनक वृत्त चर्चेचा विषय ठरला असून काल सायंकाळी 8 सुमारास पीडिताच्या घरातच 30 वर्षीय पुरुषांकडून मतिमंद असलेला 20 वर्षे मुलावर अनैतिक संबंध घडवून आणण्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा समोर आल्याबरोबर पीडिताच्या पाल्याने पोलिसात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार,गोंडपिपरी येथील नामवंत कृषी केंद्र, लेडीज कलेक्शन असे व्यवसाय असलेल्या कुटुंबात दोन मुले असून 15 वर्षाचा मुलगा नागपूर येथे शिकतो तर दुसरा मुलगा लहानपणी सायकलवरून पडल्याने मतिमंद झाल्याचे प्रमाणपत्र डॉक्टरांनी दहा वर्षांपूर्वी दिले. आई वडील दोघांचा व्यवसाय असल्यामुळे मुलगा एकटाच घरी असतो म्हणून घराच्या बाहेर, घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले होते रात्री 8.30 च्या सुमारास घराजवळील 30 वर्षीय युवक घरातून बाहेर येताना दिसताच त्याची विचारपूस केली असता पाणी पिण्यासाठी गेलो असल्याची कबुली दिली. मुलाला विचारपूस केली तेव्हा मतिमंद मुलांने सांगितले की, पाणी पिल्यानंतर माझे चिमटे, चुंबन घेतले यावर आई-वडिलांनी सीसीटीव्ही बघतात संपूर्ण प्रकार समोर आला असून अनेकांना तो दाखवण्यातही आला. यामुळे "घोर कलियुग" असल्याची चर्चा नागरिकात मध्ये जोरात सुरू आहे.
संपूर्ण घटना लक्षात येताच आई-वडिलांनी पोलीस स्टेशन गाठले व तक्रार दाखल केली, 377 कलमांतर्गत गुन्हा नोंद झाला असून पोलिसांचा तपास सुरू आहे. तीस वर्षीय आरोपी फरार असल्याचे समोर आले आहे.
0 comments:
Post a Comment