अहेरी वनपरिक्षेत्रधिकारी कार्यालयाची कारवाई
अहेरी :
अहेरी वनपरिक्षेत्रधिकारी कार्यालया अंतर्गत येणाNया बोरी जंगलातून अवैधरित्या सागवानाची तस्करी केल्याप्रकरणी वनविभागाने ६ आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून चौघांना अटक करण्यात आली, तर दोघे फरार आहेत. आरोपीमध्ये सागवन तस्करी व लावूâड खरेदी करणाNयांचा समावेश आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपी मध्ये सुरेश डोनू कर्मे रा. राजपूरपॅच, पुरूषोत्तम गिरमा चौधरी रा.राजपूरपॅच, निलेश ऋषी कर्मे, जक्का दसरू पानेमवार, रा.रामपूर यांचा समोवश आहे. तर प्रमोद नारायण दुर्गे,रामा बद्दीवार रा.रामपूर हे फरार झाले आहेत.
वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपी सुरेश डोनु कर्मे रा. राजपुरपॅच याच्या घरी अवैद्य सागवान झाडाचे तोड करुन सासुचे घरी ठेवल्याची माहिती मिळाली. त्याअनुषंगाने२ मे २०१८ रोजी चौकशी केली असता शंकुबाई लिंगाजी डोंगर यांच्या घरी १ सागवान लाकुड( ०.१३१ घ.मी.) एवढे माल आढळुन आले.
वनकर्मचारNयांनी सुरेश कर्मे यांची चौकशी केली असता पुरुषोत्तम गिरमा चौधरी यांच्याकडून लावूâड विकत घतल्याचे सांगितले. त्याअनुषंगाने पुरुषोत्तम गिरमा चौधरी यास चौकशी करीता ताब्यात घेतले असता त्यांनी बोरी जंगलातुन एका सागवान झाडाची कत्तल करून सुरेश कर्मे यांना विकल्याचे कबूल केले. वनक्षेत्र क्रमांक ५९१ (राखीव वन) मध्ये वृक्षतोड केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आरोपी पुरुषोत्तम गिरमा चौधरी याची अधिक चौकशी केली असता इतर इतरांना सुध्दा सागवना लाकडे विकल्याची माहिती दिली. प्रकरणाच्या संपुर्ण चौकशी अंती ६ जणांनावर वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास वनपरिक्षेत्रधिकारी एम.एन.चव्हान करीत आहेत.
Rahul
ReplyDelete