अमरावती: मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत कोहा अतिसंरक्षित वनात बुधवारी सायंकाळी टी-३२ वाघाचा मृतदेह तलावात आढळून आला. मृत वाघाच्या पायावर व शरीरावर काही ठिकाणी जखमा देखील होत्या. याबाबत माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत वाघाचे वय सात वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक तपासात वाघाचा मृत्यू पाण्यात बुडून झाला असल्याचे स्पष्ट झाले असले, तरी विषप्रयोग झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाण्यात विष कालवून अथवा विषारी पदार्थ खाल्ल्यामुळे वाघाचा मृत्यू झाला असावा, असा कयास आहे. वनविभागाने गुरुवारी वाघाचे शवविच्छेदन केले. दरम्यान, मेळघाटात वाघाच्या मृत्यूच्या घटना वाढत असल्याने वन्यजीव प्रेमी व संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये धारगड जंगलात एका वाघाचा मृत्यू झाला होता. या वाघाच्या मृत्यूचे कारण नैसर्गिक सांगण्यात आले असले, तरी नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालं नाही.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment