Ads

पुढच्या पिढीसाठी पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे गरजेचे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 33 कोटी वृक्षलागवडीच्या राज्यव्यापी कार्यक्रमाला वरोरा येथील आनंदवनातून सुरुवात शहरामध्येही घनदाट जंगल निर्माण करण्यासाठी मियावाकी वृक्षलागवड : ना.सुधीर मुनगंटीवार

 पुढच्या पिढीसाठी पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे गरजेचे
                                : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
33 कोटी वृक्षलागवडीच्या राज्यव्यापी कार्यक्रमाला
वरोरा येथील आनंदवनातून सुरुवात
शहरामध्येही घनदाट जंगल निर्माण करण्यासाठी
 मियावाकी वृक्षलागवड : ना.सुधीर मुनगंटीवार
वरोरा ( चंद्रपूर ) दि. 1 जुलै : दहा वर्षापूर्वी पर्यावरणासंदर्भात गांभीर्याने चर्चा सुरू असताना त्याचे चटके अल्पावधीतच इतक्या गंभीरतेने भोगावे लागेल याची कल्पना नव्हती. मात्र आता पुढच्या पिढीसाठी पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे या पिढीचे कर्तव्य असून वृक्षलागवडीच्या या मोहिमेत प्रत्येकाने आपले दायित्व द्यावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. स्वर्गीय बाबा आमटे यांच्या कर्मभूमीतून,आनंदवनातून 33 कोटी वृक्ष लागवडीच्या राज्यस्तरीय मोहिमेचा वृक्षारोपण करून त्यांच्या शुभहस्ते शुभारंभ झाला.
आज सकाळी 9.30 ला आनंदवन येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी वनविभागाच्या अटल आनंद घन-वन योजनेचा शुभारंभ वृक्षारोपणाने केला. शहरी भागात घनदाट जंगल निर्माण करण्यासाठी जपानच्या धर्तीवर मियावाकी वृक्षलागवड पद्धतीची देखील आजपासून वन विभागाकडून सुरुवात करण्यात आली. यावेळी त्यांनी आनंदवनातील स्वर्गीय बाबा आमटे यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन त्यांना आदरांजली व्यक्त केली. आनंदवनातील प्रदर्शनीला देखील त्यांनी भेट दिली. राज्यभर प्रचारासाठी निघालेल्या बाईक रॅलीला हिरवी झेडी दाखवली. त्यानंतर वन विभागातर्फे आयोजित 33 कोटी वृक्षलागवडीच्या कार्यक्रमाचा शुभारंभ केला.
यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे वित्त नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार ,वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, खा. अशोक नेते, आ. नानाभाऊ शामकुळे, आ. कीर्तीकुमार भांगडिया, आ. अॅड. संजय धोटे ,आनंदवनचे विश्वस्त डॉ.विकास आमटे, डॉ. शीतल आमटे -करजगी,सिंगापूरचे कॉन्सिल जनरल गॅवीन चाय, इस्त्रायलचे कॉन्सिल जनरल याकोव फिंकलेस्टीन, अमेरिकेचे व्हाईस कॉन्सिल जनरल रॉबर्ट पॉल्सन, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक उमेश अग्रवाल, मुख्य वनसंरक्षक एस.व्ही. रामाराव, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, गायत्री परिवाराचे ज्येष्ठ डॉ. कालीचरण शर्मा, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, वरोऱ्याचे नगराध्यक्ष ऐहतशाम अली, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, संजय देवतळे आदींची उपस्थिती होती.
यावेळी पावसापासून बचाव करणाऱ्या भव्य शामियानामध्ये आनंदवनच्या विद्यार्थ्यांपासून तर जिल्ह्यातील हजारो वृक्षप्रेमींनी गर्दी केली होती. वृक्षप्रेमींना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, 33 कोटी वृक्ष लागवड ही महत्वाकांक्षी संकल्पना आहे. पत्रकारांनी या ठिकाणी पोहोचल्यानंतरच विचारले की, आनंदवनातूनच ही 33 कोटी वृक्ष लागवडीची सुरुवात का केली जात आहे....तर ज्या नावातच वन आणि आनंद दोन्ही आहे. त्या आनंदवनाने स्वर्गीय बाबा आमटे यांच्या मार्गदर्शनात मन दुभंगलेल्या वंचितांच्या जीवनात आनंद देण्याचे काम केले. त्यामुळे यापेक्षा चांगले स्थळ आणखी कोणते असू शकते? असे आमच्या मनात आले. त्यामुळेच या समाज उपयोगी मोहिमेची सुरुवात आनंदवनातून करण्याचा निर्णय घेतला.      
ते म्हणाले,चार वर्षांपूर्वी वनविभागामार्फत 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प जेव्हा करण्यात आला. तेव्हा ही पुन्हा एक राजकीय घोषणा असावी असे सर्वांना वाटले. मात्र वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा उपक्रम लावून धरला. लवकरच 50 कोटी वृक्ष लागलेली आपल्याला बघायला मिळणार आहे. सध्या वाढत्या तापमानमुळे पर्यावरण समतोल बिघडतोय.हे समजून घेतले पाहिजे. त्याचे भीषण वास्तव समोर येत आहे. अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. यामुळे निसर्ग संतुलन बिघडले आहे. त्यासाठी पर्यावरण -हास टाळलाच पाहिजे. पुढच्या पिढीसाठी झाडे लावली पाहिजे. यातून दुष्काळावर मात करता येईल. आता जागे होण्याची वेळ आहे. धरती वाचविण्यासाठी प्रदूषण पातळी खाली आणली पाहिजे. यासाठी कार्बन उत्सर्जन कमी केले पाहिजे. पुढच्या पिढीच्या संवर्धनासाठी आता झाडे लाऊया, असे आवाहन त्यांनी केले. 
10 वर्षापूर्वी पर्यावरणाच्या ऱ्हासाची गंभीरता जाणवत नव्हती. मात्र आता त्याचे दृष्य पारिणाम दिसाताहेत. निसर्गाचे संतुलन ज्या घटकाने बिघडवले त्या घटकाचा बदला पर्यावरण स्वतःहून घेते. त्यामुळे पर्यावरणाला जपणे अतिशय आवश्यक आहे. अन्यथा पर्यावरण आपला बदला घेईल.
            कधीकाळी चंद्रपूर सारख्या जिल्हामध्ये पावसाची कमी नव्हती. परंतु आता चंद्रपूर सारख्या जिल्ह्यांमध्ये अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धन हा अतिशय चिंतेचा विषय असून गंभीर दखल घेत काम करणे आवश्यक आहे. पर्यावरणाचा समतोल राखणे आजची सर्वाधिक गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्व देशांना कार्बनचे प्रमाण 20 टक्के कमी करण्यासाठी भारत प्रयत्न करेल,असे अभिवचन दिले आहे. मोदीजींच्या या घोषणेला जागतिक स्तरावरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता वृक्ष लागवडीच्या या मोहिमेमध्ये सर्वांचा सहभाग अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक नवीन अॅप तयार करावे. या ॲपच्या माध्यमातून राज्यातला प्रत्येक नागरिक किती कार्बनचा विसर्ग करतो व पर्यावरण संवर्धनासाठी काय काम करतो याची नोंद घेतली जावी, अशी अपेक्षाही त्यांनी भाषणाच्या शेवटी केली. 
            ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात वन विभागाने गेल्या चार वर्षात केलेल्या वृक्षसंवर्धन व वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचे त्यांनी यावेळी कौतुक केले. यावर्षी निश्चितच 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण होईल. त्यात 33 कोटी पेक्षा अधिक वृक्षलागवड होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

शहरामध्येही घनदाट जंगल निर्माण करण्यासाठी मियावाकी वृक्षलागवड : मुनगंटीवार

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बोलताना विधिमंडळात अतिशय महत्त्वाचे काम असतानासुद्धा मुख्यमंत्री आनंदवन मधील या वृक्षारोपणाच्या 33कोटी वृक्षारोपणाच्या या शुभारंभाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झाल्याबद्दल आभार मानले. आनंदवन ही प्रयोगशाळा आहे. मानव धर्माची शिकवण देणारी ही मोठी संस्था आहे. वसुंधरेचे रक्षण देण्याचे शिक्षण आता आनंदवनातून संपूर्ण महाराष्ट्रात दिले जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनात वृक्ष लागवडी संदर्भात काढायच्या डाक तिकीटा संदर्भातील पहिले कव्हर आज जारी केले आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी महानगरांमध्ये घनदाट अरण्य निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या मियावाकी पद्धतीचा वनविभाग अवलंब करीत असल्याचे सांगितले.आनंदवनातून याची सुरुवात होत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
उपस्थित जनसमुदायाला यावेळी त्यांनी वसुंधरेचे कर्ज फेडण्याचे आवाहनन केले. वसुंधरा आपल्याला ऑक्सिजन देते. त्या मोबदल्यात आपण काय देतो. त्यासाठी वृक्ष लागवड हा एकमेव पर्याय असून या कर्जातून कोणतेही सरकार कर्जमाफी देणार नाही.त्यासाठी वृक्षलागवडीच्या मोहिमेत सहभागी व्हावेच लागेल असे, आवाहन त्यांनी यावेळी केले.
सुरुवातीला शंका घेणारे आता या मोहिमेत सहभागी झाले असून हरीत महाराष्ट्र सोबत हरित भारत करण्याचा संकल्प आनंदवनच्या भूमीतून जगाला गेला पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आज या कार्यक्रमाला आपल्या व्यस्ततेमुळे येऊ शकले नाहीत. त्यांनी यावेळी व्हिडिओ संदेश पाठवून त्यात 30 कोटी वृक्ष लागवडीला शुभेच्छा दिल्यात. 
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी केले. आनंदवनच्या विश्वस्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल आमटे -करजगी यांनी आनंदवनाच्या कार्याबद्दलची माहिती दिली. या कार्यक्रमांमध्ये वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तत्पूर्वी आनंदवनच्या स्वरानंदनवन आर्केस्ट्राने उपस्थित नागरिकांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमाचे संचालन मानसी सोनटक्के यांनी तर आभार वन विभागातर्फे प्रधान मुख्य वनसंरक्षक उमेश अग्रवाल यांनी मानले. कार्यक्रमाला वनविभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. जी टेंभुर्णेकर, प्रधान मुख्य वन संरक्षक रामबाबू, एम. के. राव, प्रवीण श्रीवास्तव, नितीन काकोडकर, जीत सिंग, अनुराग चौधरीउपविभागीय वन अधिकारी राम धोत्रे, अशोक सोनकुसरे  आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात वन विभागाच्या विविध प्रचार साहित्य व पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment