अभियंत्याच्या निष्काळजीपणाने कंत्राटदाराचे चांगभलं!
निष्कृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा नागरिकांचा आरोप!
चंद्रपूर - मूल तालुक्यातील बोरचांदली ते खेडी या
रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. कंत्राटदाराकडून रस्त्याच्या कामासाठी वापरलेले साहित्य हे निकृष्ट दर्जाच्या प्रतीचे असून दोन्ही बाजूंना खोदकाम न करता सुमार गरजेची गिट्टी पसरवून ओबड-धोबड काम सुरूआहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या निष्काळजीपणामुळे कंत्राटदाराच्या चांगभल्यासाठी हे सर्व होत असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आहे. बोरचांदली ते खेडी हा अत्यंत वर्दळीचा व महत्वपूर्ण मार्ग असून या मार्गावरून अनेक गावाची संपर्क होत असतो. जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे वन , वित्त व नियोजन मंत्री माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या क्षेत्रातील गावांना स्वच्छ रस्ते ,सुंदर रस्ते ,भाजप सरकारने जनतेला जाण्यासाठी अनेक रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत करण्याचे ध्येय धोरण आखले आहेत. आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला, आपल्या विधानपरिषद क्षेत्रामध्ये विकासाचा झंजावात सुरू करून. राज्याला हेवा वाटावा असा क्षेत्र बनवण्याचा मानस पालकमंत्र्यांनी उराशी बाळगलाअसला तरी, मात्र कंत्राटदाराच्या कामचुकार कामामुळे या भागात होणाऱ्या रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी दिसून येते. हे काम चंद्रपूर येथील गजानन कंट्रक्शन कंपनी करीत असल्याचे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता श्री वसुले यांनी सांगितले. या रस्त्याच्या कामासाठी आजूबाजूला शेतीतील मातीचे उत्खनन करून रस्त्याच्या कामाला वापरल्या जात असल्याचे दिसून येते. तर,काही ठिकाणी मोठमोठी गिट्टी रस्त्यावर पसरविल्या जात आहे. या पोच मार्गावर दोन्ही बाजूला फक्त डागडुगी करून सावरासावर करण्यात आले आहे .या पोचमार्गाचे बांधकाम सुरू असल्यापासून आतापर्यंत अनेक छोटे-मोठे अपघात झाल्याचे गावकऱ्यांच्या तक्रारी संबंधित विभागाला दिली असताना सुद्धा दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे चांदुली येथील सरपंचाचे मननेआहे. मात्र यासंदर्भात अभीयंता यांच्याकडे विचारणा केली असता. कुठलाच प्रकार झाला नसल्याचे सांगितले.
वास्तविकता रस्त्याचे रुंदीकरण करताना त्याचे सर्वप्रथम मजबुतीकरण करण्याची गरज आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूने खोदकाम करून त्यावर मुरूम व मुबलक पाणी, गिट्टी, टाकून रोड रोलरने दबाई करणे अपेक्षित आहे. मात्र कंत्राटदाराने असे न करता, दोन्ही बाजूला खोदकाम करून ठेवले. रोडचे चार महिने अगोदर पासून बांधकाम सुरू आहे. आणि आता, काही ठिकाणी पहिल्या पावसातच बांधकाम वाहून गेले आहे. त्यामुळे होत असलेले बांधकाम निष्कृष्ट दर्जाचे असल्याचे निष्पन्न होत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, आणि उपविभागीय अभियंता मुल यांच्या निष्काळजीपणामुळे कंत्राटदाराचे चांगभलं होत असल्याचे या परिसरातील नागरिकांनी बोलले जात आहे. या कंत्राटदाराच्या कामावर संबंधित विभागाकडून खत पाणी घातल्या जात आहे. तरी वरिष्ठ कार्यकारी अभियंता यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने घेऊन या कामाची चौकशी करून संबंधित कंत्राटदार व अधिकारी त्यांच्यावर योग्य ति कारवाई करावी अशी या परिसरातील नागरिकांची मागणी आहे.
0 comments:
Post a Comment