सुखकर्ता चिटफंड संचालक रोहित शिंगाडे व इतरांवर गुन्हे दाखल करा,!
गुंतवणूकदारांची पोलिस अधीक्षकांकडे मागणी !
प्रतिनिधी :-
जिल्ह्यातील औद्धौगिक शहर असलेल्या गडचांदूर मधे मोठ्या प्रमाणांत चिटफंडच्या नावाने गुंतवणूकदारांकडून पैसे गुंतवायला लावून चिटफंड संचालक कोट्यवधीनी फसवणूक करीत असल्याच्या अनेक तक्रारी गडचांदूर पोलिस स्टेशन मधे दिल्यानंतर सुद्धा त्या संचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले नाही, त्यामुळे
मजीद खान मियां खान, मुरलीधर गिरटकर, मोहम्मद सगीर शेख, दिपक वर्भे, गंगाधर खंडाळें, मोहम्मद अब्दुल वाहाब शेख यांनी मनसे उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या पुढाकाराने जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करून सुखकर्ता चिटफंड संचालकांविरोधात गुन्हे दाखल करावे व गुंतवणूकदारांचे पैसे मिळवून द्यावे अशी मागणी केली,
या संदर्भात स्थानिक प्रेस क्लब मधे पत्रकार परिषद घेवून आपल्यावर सुखकर्ता चिटफंड संचालक रोहित शिंगाडे, काशिम हफीज शेख, गणेश बावणे शशांक चन्ने, रोहन काकडे, रोहिणी शिंगाडे व बळवंत शिंगाडे यांनी कशी फसवणूक केली याचा पाढाच वाचला.
रोहित शिंगाडे आणि त्यांचे संचालक यांनी गडचांदूर, कोरपणा, राजूरा. चंद्रपूर येथील जवळपास १०० च्या वर गुंतवणूकदारांना आम्ही साडेतीन वर्षात पैसे दामदुप्पट देऊ असे आमिष दाखवले होते मात्र पैसे भरून मूद्दत संपल्यानंतर जेव्हा पैसे परत देण्याची वेळ आली तेव्हा अनेक बैंकचे गुंतवणूकदारांना चेक दिले पण ते सर्वच चेक बाऊंस झाले. त्यामुळे गुंतवणूकदारांची रोहित शिंगाडे आणि त्यांच्या संचालकांनी फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी गुंतवणूकदारांनी आक्रमक पवित्रा घेवून त्या संचालकांवर त्वरित करवाई करावी व आम्हचे पैसे परत मिळवून द्यावे अन्यथा आम्ही प्राणांतिक उपोषण करू असा इशारा पोलिस अधीक्षकांकडे दिलेल्या तक्रारीतून केल्याने आता या संचालकांवर कोणती करवाई होते याकडे गडचांदूर शहरातील जनतेचे लक्ष लागून आहे.
0 comments:
Post a Comment