आपण भानावर कधी येणार?
सध्या नाभिक समाज, वेगवेगळ्या गटात विभागला गेलेला आहे. समाजाचे सूत्र घेणारे स्वार्थासाठी लढत आहेत. कोणा एका व्यक्तीच्या हाती नसल्याने, समाजाचे चांगलीच गोची होत आहे. परिणामी नाभिक समाजाचा विकास थांबून समाज मागे गेला आहे. हे सर्व पाहता समाजाचे शेवटी काय होणार, असा प्रश्न किमान बुद्धिमान व्यक्तीला ज्या दिवशी पडेल, आणि नाभिक समाजाची दशा आणि दिशा या प्रश्नाच्या ज्या दिवशी विचारणे सुरू होईल, तोच नाभिक समाजाचा परिवर्तनाचा दिवस समजावा.
महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघ यांनी समाजातील खुंटलेल्या विचारसरणीला जागे करण्याचे ध्येयवेडेपणा आत्मसात करण्याचे उद्दिष्टे हाती घेतले आहे. म्हणजे आपल्या समाजातील निष्पक्ष, सगळ्यांना सोबत घेऊन व सामाजिक जान व भान ठेवून चालणारे स्वतंत्र विचाराचे साहित्यिक संघटक या संघातर्फे साहित्य संमेलनाने हे दाखवून दिले की, समाजात हजारो लोकांपेक्षा, शेकडो गुणवान, विद्वान माणसे समाजाचा आरसा असू शकतात. त्यासाठी आपणच भानावर येण्याची गरज आहे.
आतापर्यंत आपल्या समाजाला तुच्छ, हिणवले गेले, शिक्षणा बाबतीत आम्ही मागे पडत असल्याची शल्य मनात बोचत आहे. मित्रांनो आजचा काळ प्रचंड कठीण, आणि स्पर्धेचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे की., " शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. आणि ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही" म्हणून समाजाला आज ती आवश्यकता आहे. आज समाजची अवस्था पाहता अनेक प्रश्न निर्माण होतात. माणसातला स्वाभिमान,स्वत्व, विवेक जागा करण्याचे सामर्थ्य हे नक्कीच शिक्षणात आहे. पण तरीही आज शिकलेल्या सावरलेला वर्ग आपल्या स्वार्थासाठी अकलेची दिवाळखोरी असल्यासारखा वागत असेल, तर या आंधळ्यांना काय म्हणायचे?
आज समाजाची दशा आणि दिशा पाहता आपणास सर्वांना भानावर येण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील नाभिक समाजातील समाज बांधव अजूनही बलुतेदारीला अडकले आहेत. शोषण आजही केल्या जात आहे. आधुनिक काळात माणूस माणसापासून दूर जातो आहे. एका भयानक अवस्थेतून हा समाज उद्याच्या भविष्याची चिंता करीत आज नैराश्यातून वावरताना दिसतो आहे. ते सर्व आपण सारे उघड्या डोळ्यांनी बघत आहोत. या सर्व बदललेल्या जगात माझा नाभिक समाज कुठे आहे. माझ्या समाजाला बदलणारी, जोडणारी, मोठे करणारी, समाजाचे मोठेपण जगापुढे मांडणारी माणस आज कुठे आहेत?. हे तुम्ही-आम्ही शोधण्याची गरज आहे. कारण असे वागत राहिलो तर, आपल्या चांगुलपणाचा फायदा इतर समाजातील लोक सहज घेतात. कारण
" मत्सराचा कधीच विजय होत नसतो" आपल्या रोजच्या जीवनात आणि व्यवसायात हाच अनुभव शिकायला मिळतो.
"नाभिक बांधूनी तोरण आनंदाचे
हा दिन असा साजरा व्हावा
नाभिकांचा जीव इथे रूळावा
सर्व आनंदी आनंद मिळावा
सकल नाभिकासह"
सर्व भाविकांच्या कलागुणांना, विकासाला वाव मिळावा. या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा देतो.
संपादक दिनेश एकवनकर चंद्रपूर
दिनचर्या न्युज
0 comments:
Post a Comment