Ads

कर्तव्‍याची जाण व कायद्याचे ज्ञान हाच लोकप्रतिनिधीच्‍या यशाचा खरा मार्ग – आ. सुधीर मुनगंटीवार




कर्तव्‍याची जाण व कायद्याचे ज्ञान हाच लोकप्रतिनिधीच्‍या यशाचा खरा मार्ग  – आ. सुधीर मुनगंटीवार
*नवनिर्वाचित जि.प. अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले यांनी स्विकारला कार्यभार*
 
जिल्‍हा परिषदेच्‍या माध्‍यमातुन होणारी विकासकामे असो वा लोकांची कामे ही थेट लोकांपर्यंत पोचणारी असतात. कर्तव्‍याची जाण व कायद्याचे ज्ञान हाच लोकप्रतिनिधीच्‍या यशाचा खरा मार्ग आहे. त्‍यामुळे या मार्गावर चालत जिल्‍हा परिषदेच्‍या माध्‍यमातुन सर्वसामान्‍य जनतेच्‍या हिताच्‍या प्रश्‍नांच्‍या निराकरणाला प्राधान्‍य देत लोकहीत साधावे, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
 
चंद्रपूर जिल्‍हा परिषदेच्‍या नवनिर्वाचित अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले यांनी आज अध्‍यक्षपदाचा कार्यभार स्विकारला. यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार, भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंह चंदेल, माजी आमदार अतुल देशकर, भाजपा नेते राजेंद्र गांधी, जिल्‍हा परिषदेचे माजी अध्‍यक्ष देवराव भोंगळे, नवनिर्वाचित जि.प. उपाध्‍यक्षा सौ. रेखा कारेकार, महापौर राखी कंचर्लावार, मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहूल कर्डीले, जिल्‍हा परिषद सदस्‍य संजय गजपूरे, हिरामण खोब्रागडे, सौ. रेणुका दुधे, नामदेव डाहूले आदी पदाधिका-यांसह भाजपाच्‍या जिल्‍हा परिषद सदस्‍यांची उपस्थिती होती.
 
यावेळी आ. मुनगंटीवार यांनी सौ. संध्‍या गुरनुले यांना अध्‍यक्षपदाच्‍या यशस्‍वी कार्यकाळासाठी शुभेच्‍छा दिल्‍या. यावेळी बोलताना ते पुढे म्‍हणाले, दर्जेदार शिक्षण देणे हे ध्‍येय ठेवून ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचा‍वण्‍यावर भर द्यावा, अंगणवाडया या आनंदवाडया व्‍हाव्‍या यादृष्‍टीने प्रयत्‍न करावा, चंद्रपूर जिल्‍हा परिषद राज्‍यातील सर्वोत्‍तम जिल्‍हा परिषद ठरावी यादृष्‍टीने प्रयत्‍न करावा अशा सूचना त्‍यांनी यावेळी दिल्‍या. आपण ज्‍येष्‍ठ नागरिक, निराधार महिला, बचतगटातील महिला आदींचा सत्‍कार केला यावरून आपण करणार असलेल्‍या कामांची दिशा आपण निश्‍चीत केल्‍याचे दिसुन येते. आज जरी मी मंत्री नसलो तरीही या जिल्‍हा परिषदेला विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, त्‍याची चिंता करू नये. केवळ लोकहिताला प्राधान्‍य द्यावे, असेही आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.
 
ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्‍न, प्रलंबित विकासकामे यावर भर देत आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या नेतृत्‍वात ही जिल्‍हा परिषद राज्‍यात अग्रेसर ठरावी यासाठी आपण प्रयत्‍नांची शर्थ करू असे प्रतिपादन यावेळी बोलताना नवनिर्वाचित जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले यांनी केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment