शंभुसेने कडून गडपालांसह अनेक वंचितांना किराणा वाटप करून अनोख्या पद्धतीने "शंभुजयंती " साजरी*
*शंभुसेनेच्या समाज कार्याबद्दल राज्यभर कौतुकाचा वर्षाव*
श्रीगोंदा (प्रतिनिधी): दिनांक १४ मे, रोजी छत्रपती शंभुराजांच्या जयंती निमित्त शंभुसेना, माजी सैनिक आघाडीच्या वतीने किल्ले धर्मवीरगडावरील शंभुराजांच्या "शौर्यस्थळाचे" पुजन करून अनेक गरजूंना शंभुसेना प्रमुख मा. दिपक राजेशिर्के यांच्या शुभहस्ते किराणा वाटप करत अनोख्या पद्धतीने शंभुजयंती साजरी केल्याने शंभुसेनेचे राज्यभर कौतुक होत आहे.
शंभुसेना, माजी सैनिक आघाडीच्या वतीने सध्या राज्यभर लॉकडाऊनच्या आर्थिक संकटात सापडलेल्या वंचित, गरजू, गरीब लोकांना मदतकार्य करण्यासाठी सरसावली असतानाच दिनांक १४ मे, रोजी शंभुजयंती निमित्त देखील वायफळ खर्च टाळत पेडगावाच्या किल्ल्यावरील गडपालांसह गडसेवकांना तसेच तालुक्यातील अनेक वंचित घटकांना मदत कार्य करून अनोख्या पद्धतीने शंभुजयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी ऐतिहासिक राजेशिर्के घराण्याचे वंशज व शंभुसेना संघटना प्रमुख मा. दिपक राजेशिर्के यांच्या हस्ते पूजन करण्यात आले, नंतर समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून किल्ले धर्मवीरगडावर (बहादूरगड) गडाचे संरक्षण होण्याच्या उद्देशाने कामावर ठेवलेल्या गरजू रखवालदारांना (गडपालांना) व गडसेवकांना किराणा मालाचे वाटप करण्यात आले. तर दुसरीकडे शंभुसेना प्रमुख दिपकजी राजेशिर्के यांच्या सूचनेनुसार अनेक ठिकाणासह श्रीगोंदा शहरातील सिध्दार्थनगर मध्ये ही अनेक वंचित घटकांना पत्रकार चंदन घोडके तसेच अनेक मान्यवारांच्या हस्ते किराणा मालाचे वाटप करण्यात आले. याकामी शंभुसेना प्रमुख दिपकराजे शिर्के, माजी सैनिक आघाडीचे सुनीलजी काळे, अन्य माजी सैनिकांसह, लक्ष्मीकांत राजेशिर्के यांचे विशेष योगदान लाभले.
सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीमुळे यावर्षी मोजक्याच शंभुभक्तांच्या उपस्थितीत सर्व नियमांचे पालन करत गडावर शंभुजयंती साजरी करण्यात आली, पूजना नंतर धर्मवीर छत्रपती शंभुराजांचा जोरदार जयघोष करण्यात आला, याप्रसंगी शंभुसेना प्रमुख दिपक राजेशिर्के, सोशियल मीडिया प्रमुख प्रकाशजी म्हस्के, मार्गदर्शक लक्ष्मीकांत राजेशिर्के, प्रा.शिवाजी क्षिरसागर, ह.भ.प. परशुराम खळदकर, नवनाथ क्षिरसागर, प्रणव क्षिरसागर, गडपाल भाऊसाहेब घोडके, गडपाल नंदकुमार क्षिरसागर, गडसेवक मच्छिंद्र पंडित, आदीसह शंभुभक्त उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment