Ads

नागपुरात शंभुसेना,माजी सैनिक आघाडीकडून माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते गरजूंना अन्नधान्य वाटप.
नागपुरात शंभुसेना,माजी सैनिक आघाडीकडून माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते गरजूंना अन्नधान्य वाटप.

माजी मुख्यमंत्र्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

दिनचर्या न्युज :-
नागपुर (प्रतिनिधी): शहरात दिनांक १६ मे रोजी शंभुसेना, माजी सैनिक आघाडीच्या वतीने माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते नागपूर दौऱ्या दरम्यान गरजू कुटुंबांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.

सध्या लॉकडाऊच्या संकट काळात राज्यभर गंभीर परिस्थिती असल्यामुळे शंभुसेना, माजी सैनिक आघाडीच्या वतीने राबवत असलेल्या विविध समाजकार्याचा आढावा घेत, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी नागपूर दौऱ्या दरम्यान माजी सैनिक आघाडीच्या संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट दिली असता, माजी सैनिक आघाडीचे उपाध्यक्ष मा. रामजी कोरके यांच्याशी समाज कार्याबाबत सविस्तर चर्चा झाली. चर्चेत शंभुसेना संघटनेचे प्रमुख/ अध्यक्ष व माजी सैनिक मा.दिपकजी राजेशिर्के व आघाडीचे उपाध्यक्ष रामजी कोरके यांच्या वतीने सुरू असलेल्या विविध कार्याची माहिती घेऊन संघटनेच्या निस्वार्थ समाजकार्याची स्तुती करत, विशेष आभार व्यक्त केले, तसेच एकत्रीत कामाची माहिती घेऊन सर्वच कार्यकर्त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप टाकत कार्यकर्त्यांंना प्रोत्साहन देत भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.

संपर्क कार्यालयातील सदिच्छा भेटी नंतर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते अनेक गोरगरीब कुटूुंबाना अन्न धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष रामजी कोरके यांच्यासह अनेक माजी सैनिक उपस्थित होते. या समाजकार्यास किल्ले धर्मवीरगड येथील ऐतिहासिक शिर्के घराण्याचे वंशज, शंभुसेना प्रमुख व माजी सैनिक मा. दिपक राजेशिर्के, उपाध्यक्ष मा.राम कोरके, महिला आघाडी अध्यक्षा सौ. ज्योत्स्ना गर्गे, उपाध्यक्षा सौ. निर्मला पवार, माजी सैनिक आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष मा. सुनिल काळे, शंभुसेनेचे मार्गदर्शक लक्ष्मीकांत राजेशिर्के, माजी सैनिक आनंद ठाकूर, बाबासाहेब जाधव, भास्कर पवार, बी.व्ही जाधव, एम.व्ही बिराजदार, रामचंद्र पानसरे, राज ठाकूर, रमेश गायके, आजितराव निंबाळकर, सचिन वाघमारे, पिंपरी चिंचवड शहरातील माजी सैनिक आघाडी व पदाधिकारी शंभुभक्त कार्यकर्ते यांचे योगदान लाभले.

दिनचर्या न्युज
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment