जिल्हात डॉक्टरच ठरला कोरोनाचा बळी, डॉ सुनील टेकाम हे वरोरा ग्रामीण रुग्णालयात कार्यरत होते.
चंद्रपूर :- दिनचर्या न्युज
आज दिनांक 21 ऑगस्ट 2020 ला कोरोना योध्दा डॉ. सुनिल टेकाम यांचे कोरोनाने निधन झाल्याचे वृत्त टीम दिनचर्या ला मृतक डॉक्टरांच्या नातेवाईकांनी दिले आहे.
कोरोना रूग्नाची सेवा करतांना या कोरोना योद्धाला कोरोनाची लागण झाली.डॉ. सुनील टेकाम हे वरोरा ग्रामीण रुग्णालयात कार्यरत होते.ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात त्यांना कोरोना ची बाधा झाल्याने चंद्रपूर जिल्हा कोविड केअर सेंटर ला उपचार घेत असताना आज 21 ऑगस्ट ला दुपारी 4:30 च्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात परिचारिका पत्नी व दीड वर्षाचा मुलगा आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात यापूर्वी कोरोनामुळे 10 मृत्यू झाले असून एखाद्या तरुण डॉक्टर च्या मृत्यूची ही पहिलीच घटना आहे. या कोविड योद्धाच्या विरगतीने टेकाम कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यातुन त्यांना सावरण्याचे बळ मिळो हीच प्रार्थना.
0 comments:
Post a Comment