भद्रावती (जावेद शेख ): येथील प्रतिष्ठित वकील आणि सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व स्व. प्रशांत भाऊरावजी भडगरे यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. सज्जन, प्रेमळ, समाजहितासाठी सदैव तत्पर आणि विविध सामाजिक उपक्रमांत सहभागी राहणारे व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
Renowned lawyer from Bhadravati, Late Prashant Bhauraoji Bhadgare, passes away; A gentleman in the social sector has been lost
स्व. प्रशांत भडगरे हे स्वातंत्र्यसंग्राम सैनिक स्व. गणपतराव मोगरे यांचे नातू तसेच भद्रावतीचे नामांकित व्यापारी स्व. भाऊरावजी भडगरे यांचे सुपुत्र होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात घराण्याची सेवा परंपरा आणि सामाजिक कार्याची कळकळ दिसून येत होती.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अचानक निधनाने भद्रावती शहरात दुःखाचे वातावरण पसरले असून विविध क्षेत्रातील नागरिकांकडून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
प्रशांत भडगरेंच्या आत्म्यास शांती लाभो, तसेच त्यांच्या परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना अनेकांनी व्यक्त केली आहे.
0 comments:
Post a Comment