मूल / विशेष प्रतिनिधी :-
न.प. निवडनुकीत जस जसे प्रचाराला वेग येऊ लागला आहे, तसे भाजपा आपली पकड अधिक मजबूत करताना दिसत आहे. परंतु आश्चर्यकारक बाब म्हणजे प्रचारात मागे असल्याचे दिसणाऱ्या शिवसेना (शिंदे गट) च्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भारती राखडे या काँग्रेसला मागे टाकत पुढे जाताना दिसत आहेत. पक्षाकडून त्यांना पूर्ण पाठबळ मिळू लागल्याचे स्पष्ट दिसत असून, लाडकी बहिण योजना — जी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली होती, आजही सुरू आहे. त्यामुळे या योजनेचा जनाधार मोठ्या प्रमाणात शिवसेना (शिंदे) यांच्या उमेदवार भारती राखडे यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे.
!!! Will Shiv Sena's Bharati Rakhde create history in the N.P. elections? !!!
न.प.अध्यक्ष पदाच्या उमेदवार भारती राखडे या एक सर्वसामान्य घरातील पण जनहितासाठी नेहमीच काम करणाऱ्या उमेदवार आहेत. गल्लीतल्या–बस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या समस्या मांडणारी एकमेव महिला उमेदवार म्हणून त्यांची ओळख आहे. इतर उमेदवारांप्रमाणे त्या फक्त निवडणुकीच्या काळात नव्हे, तर वर्षानुवर्षे गरीब वस्त्यांमध्ये फिरून सेवा करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून लोकांच्या मनात स्थान मिळवून आहेत.
भारती राखडे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊनच शिवसेना शिंदे गटाने त्यांना पक्षात घेतले आणि अल्पावधीतच जिल्हास्तरावरील जबाबदाऱ्या दिल्या. आता त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देऊन न.प.मध्ये पाठवण्यासाठी पक्ष पूर्ण ताकद लावत आहे. लाडकी बहिणींमधील महिलांचे म्हणणे आहे की ही योजना शिंदे सरकारची देण आहे, आणि त्यामुळे त्या मोठ्या प्रमाणात भारती राखडे यांच्या पाठीशी उभ्या राहताना दिसत आहेत.
मुल वासी जनतेमध्ये त्यांना सर्वसामान्य व चांगल्या कार्यकर्त्या म्हणून पाहिले जाते. महिलांपासून तरुणांपर्यंत अनेक जण भारती राखडे यांना न.प.च्या अध्यक्षपदावर पाहण्यासाठी दिवस-रात्र विनास्वार्थ मेहनत घेत आहेत. त्यामुळे जनतेमध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूतीचं वातावरण तयार झालं आहे. आजच्या घडीला त्या काँग्रेसच्या चर्चित उमेदवाराला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर झेप घेताना दिसत आहेत. त्यामुळे अंतिम सामना भाजपा आणि शिवसेना (शिंदे) यांच्यात होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. नगरसेवक पदासाठी शिवसेना कडून उभे असलेले सात ही उम्मेदवार सुद्धा विजयाचे मार्गावर असल्याचे बोलले जात आहेत.
मतदाना साठी उद्याची 2 तारीख निश्चित आहे . जर सर्वसामान्य मतदार आणि लाडक्या बहिणी एक सर्वसामान्य आणि गरीब घरातून आलेल्या उमेदवार भारती राखडे यांच्या बाजूने उभे राहिले तर कमी मतांनी का होईना — त्या विजयी होऊन नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे घडले तर ते चमत्कार म्हणूनच पाहिले जाईल. आज त्या काँग्रेसच्या उमेदवाराला मागे टाकत क्रमांक 2 वर पोहोचल्या आहेत आणि कमी खर्चातील उमेदवारीचे रेकॉर्ड त्यांच्या नावावर जमा झाले असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
भाजपला आता भारती राखडे यांना खऱ्या प्रतिस्पर्धी म्हणून पाहावे लागेल.भाजप किंवा काँग्रेसने त्यांना कमी लेखणे निवडनुकीत विजया साठी घातक ठरू शकते.आता निवडणुकीत लढत भाजप कांग्रेस या दोघां मध्ये नसुन भाजपा विरूध्द शिवसेंना (शिंदे ) होणार असल्याचे मत राजकिय विश्लेशकांचे आहे.
अलिकडेच काढलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या भव्य रॅली आणि गरीब मतदारांमध्ये मिळत असलेला वाढता जनाधार या सर्वांचा विचार करता असे म्हटले जात आहे की भारती राखडे काँग्रेसचा संपूर्ण गणित बिघडवू शकतात आणि काँग्रेसची उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर जाऊ शकते. जर हीच स्थिति 2 डिसें. च्या पहाटे पर्यंत कायम राहिली, तर भारती राखडे इतिहास रचू शकतात ज्याला जनता वर्षानुवर्षे लक्षात ठेवेल !
********************************
0 comments:
Post a Comment