राजुरा २६ नोव्हेंबर :- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल येथे भारतीय संविधान दिनानिमित्याने विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
Children performed a street play on the occasion of Constitution Day at Adarsh School.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे यांची उपस्थिती होती.तर प्रमुख अतिथी म्हणून आदर्श हायस्कूल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले, आदर्श प्राथमिक शाळेचे शालेय मंत्रिमंडळातील राष्ट्रपती नैतिक चापले, आदर्श हायस्कूल शालेय मंत्रिमंडळातील राष्ट्रपती अनोखी निकोडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी "माझे संविधान माझा अभिमान" हे पथनाट्य सादर केले. यामध्ये इयत्ता तिसरीच्या स्वरा चिट्टलवार, शीतल सरनाईक, संजीवनी भंडरवार, दिप्ती पावडे, ईतीशा बोबडे, विराज दहागावकर, जयेश कोवे , मोहित धनवलकर, अर्णव गोवर्धन आदींनी सहभाग घेतला. तसेच संविधान जनजागृती प्रभातफेरी, घोषवाक्य लेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा अविनाश वसाके इयत्ता तिसरीच्या विद्यार्थीनिने केले तर आभार प्रदर्शन स्वरा चिट्टलवार हिने मानले. कार्यक्रमात सामूहिकरित्या भारताचे संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. तसेच २६ नोव्हेंबर ला मुंबई येथे झालेल्या आतंकवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
0 comments:
Post a Comment