चंद्रपुर : ब्रम्हपुरी शहरातील शेषनगर परिसरातील माय हेल्थ प्रो स्पा अॅण्ड वेलनेस सेंटर My Health Pro Spa and Wellness Center येथे सुरु असलेल्या वेश्याव्यवसायावर prostitution स्थानिक गुन्हे शाखा (LCB) चंद्रपूर यांनी मोठी धडक कारवाई केली. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दि. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी विशेष पथकाने छापा टाकून मिझोरम व नागालँड राज्यातील तीन पीडित महिलांची सुटका केली.
LCB takes strong action against prostitution in Brahmapuri; Raid on 'My Health Pro Spa', three victims rescued — Manager arrested, owner absconding
स्पा सेंटरमध्ये आसामी महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची खात्री झाल्यानंतर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 (PITA) अन्वये कारवाई करण्यात आली. या छाप्यामध्ये स्पा मॅनेजर करण गंगाधर मोहजनकर (वय 24) याला ताब्यात घेण्यात आले असून स्पा मालक प्रितीश बुर्ले हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
कारवाईदरम्यान रोख रक्कम, मोबाईल, रजिस्टर, पावती बुक, स्कॅनर, कंडोम पाकिटे असा एकूण ₹18,060/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनमध्ये PITA अधिनियम कलम ३, ४, ५, ७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. विशेष कारवाईत PI अमोल काचोरे (LCB), PI प्रमोद बानबले (PS ब्रम्हपुरी) तसेच महिला पोलीस कर्मचारी, पंच, समाजसेविका व स्थानिक गुन्हे शाखेचे जवान सहभागी होते.
स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन यांनी ही कारवाई संयुक्तरीत्या करून वेश्याव्यवसायाच्या धंद्यावर मोठा लगाम लावला आहे.
0 comments:
Post a Comment