Ads

अवैध रेती वाहतूक प्रकरणात तिघे जेरबंददोन ट्रॅक्टरसह 12.20 लाखांचा मुद्देमाल जप्त

चंद्रपूर, दि. १८ नोव्हेंबर — जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उपसा व वाहतूक रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा सक्रिय झाली असून काल उशिरा रात्री घुग्घुस परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे घुग्घुस पोलीस स्टेशन हद्दीत सापळा रचून दोन ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये चोरटी रेती वाहतूक करणाऱ्यांना धरत एकूण १२,२०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Crime News
Three arrested in illegal sand transportation case
Two tractors and valuables worth Rs 12.20 lakh seized
जप्त करण्यात आलेल्या आरोपींची नावे —
सुंदर रामचंद्र कुकडे, मनोज सुरेश झाडे,
राकेश भाऊराव गोर (रा. वडा, घुग्घुस) अशी आहेत. तीघांना ताब्यात घेऊन घुग्घुस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दोन ट्रॅक्टर-ट्रॉली (किंमत १२ लाख रुपये) तसेच २ ब्रास अवैध रेती (किंमत २० हजार रुपये) असा एकूण १२.२० लाखांचा माल ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी गु.र.नं. २२०/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता ३०३(२), ३(५) तसेच म.ज.म.स. कलम ४८(७), ४८(८) व मो.वा.का. कलम १७७ नुसार गुन्हा नोंदविला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकात पोउपनि. संतोष निंभोरकर, पोउपनि. सर्वेश बेलसरे, पोहवा नितीन कुरेकार, गणेश भोयर, सचिन गुरनुळे, पोअं प्रदीप मडावी, अजित शेन्डे यांचा सहभाग होता.

या प्रकरणाचा पुढील तपास घुग्घुस पोलीस करत आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment