राजुरा १८ नोव्हेंबर :-
राजुरा येथील डॉ. प्राजक्ता भूपाळ पिंपळशेंडे यांनी जिद्द, चिकाटी आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या बळावर नुकतीच सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठातून (SPPU) पीएचडी पदवी संपादन केली. त्यांनी कायद्यामध्ये (Law) डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी.) यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.Dr. Prajakta Pimpalshende's PhD in Law
डॉ.प्राजक्ता पिंपळशेंडे यांच्या 'महाराष्ट्रातील पर्यटन धोरण आणि प्रशासनासंबंधी कायद्याचा एक चिकित्सक अभ्यास' या विषयावर डॉ.शाहिस्ता इनामदार यांचे मार्गदर्शनात अगदी वेळेत त्यांनी पीएचडी पदवी संपादन केली. त्या राजुरा येथील नामवंत डॉ. लीला व डॉ. भूपाळ पिंपळशेंडे यांच्या कन्या असून सध्या त्या मॉडर्न लॉ कॉलेज गणेशखिंड, पुणे येथे प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. जिद्द,चिकाटी,मेहनत आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर विज्ञान शाखेतून कायद्याकडे डॉ.प्राजक्ता पिंपळशेंडे यांनी केलेला प्रवास नक्कीच उल्लेखनीय आहे. त्यांचा संशोधनातील अभिनव दृष्टिकोन, विषयातील सखोल अभ्यास आणि शैक्षणिक गुणवत्ता यासाठी त्यांचे विद्यापीठाकडून तसेच त्यांचे आईवडील,मार्गदर्शक व कुटुंबियांकडून कौतुक करण्यात येत आहे.
0 comments:
Post a Comment