मुल/ नासीर खान:- नगर परिषद निवडणुकीत अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून शिवसेना (शिंदे गट) तर्फे सौ. भारती ताई राखडे यांची उमेदवारी जाहीर होताच या पदाच्या निवडणुकीची चुरस अधिकच वाढली आहे. भाजपा, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात तगड्या स्पर्धेचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिवसेनेत राहून अल्पावधीतच जनतेच्या मनामनात स्थान निर्माण करणाऱ्या राखडे यांनी सामाजिक कार्यांच्या जोरावर मूल वासीयांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नारी शक्तीचे प्रतिनिधित्व करत त्यांनी शिवसेना जिल्हास्तरावर काम करण्याची जबाबदारी निभावली असून पक्षाकडून त्यांना उच्च पदही देण्यात आले आहे. महिलांच्या सुख–दुःखात सहभागी होणे, अन्याय-अत्याचाराविरुद्ध नेहमीच अग्रस्थानी उभे राहणे हे त्यांचे स्वभावधर्म झाले आहे. मूल येथील महिलांच्या आग्रहास्तवच त्यांनी शिवसेनेच्या वतीने न.प. अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पक्षाच्या उच्च नेत्यांकडून हिरवा कंदील मिळताच त्यांनी शिवसेना (शिंदे गट) च्या अधिकृत उमेदवार म्हणून नामांकन दाखल केले आहे.
चुनावाच्या रणांगणात राखडे यांच्या समोर अनेक दिग्गज प्रतिस्पर्धी असणार हे लक्षात घेऊन त्यांनी प्रचाराची सूत्रे डोअर-टू-डोअर मोहिमेकडे वळवली आहेत. श्रीमंत, गरीब आणि सर्वसामान्य महिलांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्यांच्या मिलनसार स्वभावामुळे आणि स्वच्छ,निर्व्याज प्रतिमेमुळे त्या सर्व स्तरातील मतदारांच्या आकर्षणाचे केंद्र बनल्या आहेत. विशेष म्हणजे, या निवडणुकीत मतदारांचा कल नवीन चेहऱ्याकडे असल्याचे दिसते. त्यांच्या प्रचारासाठी युवा कार्यकर्त्यांची मोठी फौज जोमाने कामाला लागली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे तसेच पक्षाचे दिग्गज नेते त्यांच्या प्रचारासाठी येण्याचीही मोठी शक्यता आहे.
0 comments:
Post a Comment