जावेद शेख भद्रावती :- भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे धरतीचे आबा, क्रांतिवीर, जननायक क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीचा उत्साहपूर्ण सोहळा नुकताच पार पडला. मेरा युवा भारत, चंद्रपूर (युवा कार्यक्रम एवं क्रीडा मंत्रालय, भारत सरकार), बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट व शौर्य क्रीडा मंडळ, चंदनखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
150th birth anniversary of revolutionary Birsa Munda celebrated with enthusiasm at Chandankheda
या कार्यक्रमाला समाजपरिवर्तक तथा माजी उपसरपंच विठ्ठल रामकृष्ण हनवते यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मनोहर शालिक हनवते (अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्त समिती), पोलिस पाटील समीर खान पठाण, प्रभाकर दोडके, सुधाकर दोडके, गजेंद्र रणदिवे, फिरोज पठान, सिंगलदिप पेंदाम, उमेश घोडाम आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यापासून झाली.
या प्रसंगी बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट व शौर्य क्रीडा मंडळ यांचे सदस्य
गणेश हनवते, मंगेश हनवते, आशिष हनवते (अध्यक्ष, शौर्य क्रीडा मंडळ), राहुल कोसुरकार, माधव दोडके, नंदकिशोर जांभुळे, मिलिंद पांढरे, विठ्ठल महागमकार, कुणाल ढोक, शंकर दडमल, पंकज दडमल, बंडुजी दडमल, वैशाली दडमल, दिलीप ठावरी, देवानंद दोडके, स्वप्निल दडमल, अमोल महागमकार, प्रज्वल हनवते, बबलू शेख, हुसेन शेख, भोला पेटकर, प्रमोद राखुंडे, लहु राखुंडे, संतोष गायकवाड, सुरेश हनवते, कवडू दडमल, ईश्वर दडमल, निमेश नन्नावरे, अक्षय नन्नावरे, उद्धव नन्नावरे, जित कोकुडे, प्रक्षित नन्नावरे, ओमकार राखुंडे आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
तसेच मेरा युवा भारत – चंद्रपूर चे माजी तालुका समन्वयक आशिष हनवते यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष बळ मिळाले.
कार्यक्रमाला चंदनखेडा तसेच परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. बिरसा मुंडा यांचे आदर्श, त्यांचे दैदिप्यमान क्रांतिकारक कार्य आणि आदिवासी समाजासाठीचे योगदान यांची माहिती या कार्यक्रमात देण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन आयोजक प्रतिनिधींनी केले.
0 comments:
Post a Comment