Ads

पाथरी पोलिसांची मोठी कारवाई — ६ लाख ७८ हजार रुपयांची बनावट विदेशी दारूची खेप जप्त; तीन तस्कर अटकेत

पाथरी (२२ नोव्हेंबर २०२५) — पाथरी पोलिसांनी मौजा पाथरी येथील गोसेखुर्द नाल्याजवळ शनिवारी सकाळी केलेल्या नाकाबंदीत बनावट विदेशी दारू तस्करीचा मोठा पर्दाफाश केला. सकाळी सुमारे ९ वाजता ठाणेदार सपोनि. नितेश डोर्लीकर आपल्या पथकासह पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की पालेबारसा रोडमार्गे पांढऱ्या स्विफ्ट डिजायर कार व काळ्या सुजुकी अ‍ॅक्सेस मोपेडमधून अवैध विदेशी दारू पाथरीकडे येत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी नहर परिसरात तातडीने नाकाबंदी उभारली.
Pathri police's major operation - consignment of fake foreign liquor worth Rs 6 lakh 78 thousand seized; three smugglers arrested
थोड्याच वेळात मुखबिराने दिलेल्या वर्णनातील दोन्ही वाहने येताना दिसली. पंचांच्या उपस्थितीत तपासणी केली असता स्विफ्ट डिजायर कारच्या डिक्कीतून पांढऱ्या पिशवीत ४८ बाटल्या, दोन हिरव्या पिशव्यांत ९६ बाटल्या आणि चार बॉक्समधून १९२ बाटल्या—अशा एकूण ३३६ बाटल्या ‘रॉयल स्टॅग’ (१८० मि.ली.) बनावट विदेशी दारू सापडली. तर मोपेडच्या डिक्कीतून आणखी ४८ बाटल्या मिळून एकूण ३८४ बाटल्यांची बनावट विदेशी दारू जप्त करण्यात आली. जप्त मालाची किंमत अंदाजे ९६,००० रुपये इतकी आहे.

तसेच स्विफ्ट डिजायर कार (५,००,००० रुपये), सुजुकी अ‍ॅक्सेस मोपेड (६०,000 रुपये) व आरोपींकडील मोबाईल फोन (२२,000 रुपये) असा मिळून एकूण ६,७८,००० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली असता आरोपींनी आपली नावे कृष्णा धर्मा कंजर (१९, रा. कंजर मोहल्ला, जटपूरा गेट, चंद्रपूर), प्रकाश रमेश भोयर (३७, रा. भानापेट वार्ड, जलराम मंदिरजवळ, चंद्रपूर) आणि सागर राजेश कंजर (३२, रा. कंजर मोहल्ला, जटपूरा गेट, चंद्रपूर) अशी सांगितली. उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणीत दारू बनावट असल्याची पुष्टी झाली.

या प्रकरणात पाथरी पोलिस ठाण्यात अप. क्र. ११३/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ ची कलम १२३ तसेच मद्यनिषेध कायदा कलम ६५(अ), ६५(ई), ८३ प्रमाणे गुन्हा नोंदवून तिघांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार नितेश डोर्लीकर, पोउपनि. गोविंद चाटे व पोलिस पथकाच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वीरीत्या पार पडली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment