राजुरा २४ नोव्हेंबर :-
सर्वोदय विद्यालय सास्तीच्या प्रांगणात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन मेळावा पार पडला. यावेळी शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक आत्माराम शेंडे , आनंदराव मत्ते, प्रभाकर साळवे, शरद खरतड , गोपाळ बुरांडे , सुकलदास कांबळे, तसेच सध्या कार्यरत शाळेतील शिक्षक रमेश अडवे , समीर वानखेडे , किशोर अंबादे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून झाली. त्यानंतर विद्यार्थीनी राष्ट्रगीत घेऊन, सर्व शिक्षकासमवेत २००५ मध्ये भरत असलेल्या इयत्ता १० वी च्या वर्गखोलीत बसत जुन्या आठवणीना उजाळा दिला. शिक्षकांनी सर्व विध्यार्थीचा परिचय घेत त्यांची माहिती जाणून घेतली. यानंतर सेवानिवृत्त शिक्षक तथा शाळेतील शिक्षकांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करत वीस वर्षांनंतर भेटलेल्या शिक्षक व वर्गमित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळेस माजी विध्यार्थांनी शाळेसाठी शैक्षणिक साहित्य,वस्तू भेट दिल्या.
Former students of Sarvodaya Vidyalaya Sasti came together after almost twenty years.
नंतर सर्व माजी विध्यार्थांनी प्रश्नमंजुषा, अंताक्षरी व इतर मनोरंजनाचे खेळांचे आयोजन केले. या कार्यक्रमास माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्नेह भोजनानंतर पुन्हा भेटण्याचे निमंत्रण देत कार्यक्रमाचा समारोप झाला. शालेय जिवनाच्या आठवणी मनात साठवत सर्वांनी एकमेकांना निरोप दिला. हा क्षण सर्वांसाठी अत्यंत भावनिक असा होता. शालेय जिवनाच्या आठवणींना उजाळा देत वर्गातले मजेशीर किस्से देखील आठवले. या कार्यक्रमाची संकल्पना आणि नियोजन मंगेश काकडे, संदीप जुजिपेल्ली, लता गौरकार, खुशाल अडवे, नितीन गोवर्धन यांनी केले तर सूत्रसंचालन संतोष शेंडे , दिपक रागीट यांनी केले आणि आभार प्रदर्शन कु. प्रियंका नळे हिने केले. विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या दोन तीन महिन्याच्या संपर्कानंतर हा माजी विद्यार्थीचा स्नेहमिलन सोहळा घडून आला.
0 comments:
Post a Comment