भद्रावती प्रतिनिधी जावेद शेख — शहरातील मोटारसायकल चोरी प्रकरणात भद्रावती पोलिसांनी अचूक व नियोजनबद्ध कारवाई करून चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत करत आरोपीस ताब्यात घेतले. दि. 04 नोव्हेंबर 2025 रोजी फिर्यादी शंकर कवाडे (रा. वडाळा तुकूम) यांनी त्यांच्या गुलमोहर पार्क, गेट क्र. 2, संताजी नगर, भद्रावती येथून CD डिलक्स मोटारसायकल (किंमत सुमारे ₹20,000/-) चोरीस गेल्याची तक्रार पोलीस ठाणे भद्रावती येथे अप. क्र. 603/25, कलम 303(2) BNS अंतर्गत नोंदविली होती. Crime News
Stolen motorcycle recovered within 24 hours – accused arrested
गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, रेकार्डवरील आरोपी विकास ऋषी बावणे (रा. गुरुनगर, भद्रावती) यास पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीकडून चोरी केलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली. यामुळे सदर गुन्हा पूर्णपणे उघडकीस आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक, चंद्रपूर, मा. अप्पर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर, तसेच मा. श्री संतोष बाकल, उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहभागी पथक
या कारवाईत पो. नि. योगेश्वर पारधी (पोलीस ठाणे भद्रावती), पो. उपनि. गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, जगदीश झाडे, अनुप अस्तुंकर, विश्वनाथ चौधरी, गोपाल आतकुलवार, योगेश घाटोळे, रोहित चिडगिरे, खुशल कावळे, संतोष राठोड यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
0 comments:
Post a Comment