भद्रावती प्रतिनिधी ( जावेद शेख) :-नागपूर विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क माननीय श्री गणेश पाटील व जिल्हा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूर माननीय श्री नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या आदेशानुसार नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूबंदीचे काटेकोर पालन करण्यात येत आहे.
Major liquor ban operation in Mendki-Nagbhid!
दिनांक 01/12/2025 ते 03/12/2025 मतमोजणीचा संपूर्ण दिवस कोरडे असल्याने दारूविक्री बंद होती. दरम्यान, गुप्त बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली की मौजा मेंडकी (ता. ब्रम्हपुरी) व नागभीड (ता. नागभीड, जि. चंद्रपूर) परिसरात श्रावण डुकरु मारबते (रा. मेंडकी), श्रीमती नंदा शिवराज मसराम व मल्लारेड्डी आगा नरेडला (दोन्ही रा. नागभीड) हे मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूचा अवैध साठा ठेवून आहेत.
त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारूबंदी गुन्ह्यांबाबत छापा टाकला असता खालीलप्रमाणे मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला—
🔹 जप्त मुद्देमाल :
1️⃣ रॉकेट देशी दारू – 90 ML ची 900 बाटल्या (9 खर्ड्यांमध्ये)
2️⃣ टँगो देशी दारू – 180 ML ची 1710 बाटल्या (35 खर्ड्यांमध्ये)
3️⃣ रॉयल Stag विदेशी मद्य – 180 ML च्या 144 बाटल्या (3 खर्ड्यांमध्ये)
एकूण किंमत : ₹2,11,800/-
या कारवाईत प्रभारी निरीक्षक श्री दत्तात्रय वरठी,दुय्यम निरीक्षक श्री सोमेश्वर गव्हारे,
दुय्यम निरीक्षक श्री हर्षराज इंगळे,
तसेच जवान गोकुळ पवार व महिला जवान सौ. सुकेशनी कारेकार यांचा सक्रिय सहभाग होता.
पुढील तपास प्रभारी निरीक्षक दत्तात्रय वरठी करीत आहेत.
0 comments:
Post a Comment