Ads

राजुरा हद्दीत अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

राजुरा (ता. 04 डिसेंबर 2025) — चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत पोलीस स्टेशन राजुरा हद्दीत अवैधरीत्या गौण खनिज (रेती) वाहतूक करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Local Crime Branch takes action against those involved in illegal sand transportation in Rajura area
या प्रकरणात पो.स्टे. राजुरा येथे अप. क्र. 598/25 भादंवि व गौण खनिज प्रतिबंधक कायद्यांतर्गत कलम 303(2), 3(5) BNS तसेच महा. जमीन महसूल संहिता कलम 48(7), 48(8) व मोटार वाहन कायद्यातील कलम 130, 177 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त मालामध्ये समाविष्ट :
अवैध रेती वाहतुकीसाठी वापरलेले ३ ट्रॅक्टर — किंमत अंदाजे ₹15,00,000
ट्रॅक्टरमधील ३ ब्रास गौण खनिज (रेती) — किंमत अंदाजे ₹15,000
याप्रमाणे एकूण ₹15,15,000 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कारवाई पथक :
उपविभाग राजुरा – गडचांदूर पथक, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांच्या संयुक्त कारवाईत ही धडक मोहीम पार पडली.


--
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment