Ads

बातमी का लावलास म्हणून पत्रकारवर गावगुंडांनी केला प्राणघातक हमला!

बातमी का लावलास म्हणून पत्रकारवर गावगुंडांनी केला प्राणघातक हमला!

०९ मे ला वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण केल्याची बातमी दिल्याचा राग मनात धरून गावगुंडांसह केली मारहाण.

दिनचर्या न्युज :-
सिंदेवाही तालुक्यात आज लोकशाहीला काळिमा फासत पत्रकारितेच्या स्वातंत्र्याला तडा देण्याचा प्रकार घडून आला आहे.
India 24 news चॅनेल (पोर्टल) चे विशेष जिल्हा प्रतिनिधी अरुण मादेशवार हे स्वतःच्या मुलासह आपल्या वैयक्तिक कामाकरिता गुंजेवाही मार्गे सिंदेवाहीला जात असताना पाळत ठेऊन असलेल्या काही समाजकंटकांनी रस्त्यात त्यांची दुचाकी थांबवून त्यांना व त्यांच्या मुलाला मारहाण केल्याची घटना पुढे आली़ आहे.
अरुण मादेशवार हे सिंदेवाही तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा India 24 News चॅनेल (पोर्टल) चे विशेष जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पाहतात. त्यांनी दि. ०९ मे २०२० रोजी सिंदेवाही तालुक्यातील तलाठी साजा क्र. १९ मध्ये येत असलेल्या खैरी (चक) गटातील गट क्र. ८५ मध्ये अवैध वृक्षतोड करून वनविभागाच्या जागेवर शेती काढत असल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आणून आपल्या India 24 News पोर्टलला बातमी लावली. या बातमीमुळे चौकशी सुरू झाल्याने अनेकांची धडकी भरली. या सबंध बाबीचे राग मनात धरून मरेगाव परिसरातील अंबादास दुधे व पत्नी, देव्हारे व पत्नी आणि दोन अन्य इसम व दोन महिला अशा एकूण आठ बाया-माणसांनी जंगलात दुचाकी थांबवून आमच्या प्रकरणाची बातमी का लावली? अशा शब्दात शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. यामध्ये अरुण मादेशवार यांना हाताला व डोक्याला मार असून त्यांच्या मुलाला किरकोळ मारहाण आहे. तसेच यांचेजवळील mobilephone मारहाण करणार्‍यांनी फोडून टाकले. सदरहू घटनेची तक्रार अरुण मादेशवार यांनी पोलीस ठाणे सिंदेवाही येथे जावून दिल्यानंतर आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १४३, १४६, १४७, १४९, ३२३ आणि ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोमेद पाटील यांच्या निरीक्षणात चालू आहे.

सदर घटनेचा जिल्हाभरातील पत्रकार मंडळीनी निषेध नोंदवून आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. आणि दिवसेंदिवस पत्रकारांवर होणार्‍या हल्ल्यामुळे लोकशाहीचे चौथे स्तंभ म्हणून आपली भूमिका बजावणार्‍या पत्रकारांचे स्वातंत्र्य धोक्यात येत आहे. याकडे वेळीचं लक्ष घालून पत्रकारांसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

दिनचर्या न्युज
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment