जिल्ह्यात मागील 24 तासात 148 कोरोनामुक्त
137 नव्याने पॉझिटिव्ह ; एका बाधिताचा मृत्यू
Ø आतापर्यंत 12670 बाधित झाले बरे
Ø उपचार घेत असलेले बाधित 2870
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, दि. 31 ऑक्टोबर: जिल्ह्यात गत 24 तासात 148 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 137 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्या बाधितामध्ये भद्रावती शहरातील सुरक्षा नगर येथील 75 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 232 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 217, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली सहा, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 137 बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 15 हजार 772 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 148 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 12 हजार 670 झाली आहे. सध्या 2 हजार 870 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 20 हजार 54 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 2 हजार 827 नमुने निगेटीव्ह आले आहे. नागरिकांनी बाहेर पडतांना तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा तसेच दैनंदिन कामे करताना सोशल डिस्टंसिंग पाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
तालुकानिहाय बाधितांची संख्या:
जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या 137 बाधितांमध्ये 76 पुरुष व 61 महिला आहेत. यात चंद्रपूर शहर व परीसरातील 59, पोंभुर्णा तालुक्यातील दोन, बल्लारपूर तालुक्यातील 13, चिमूर तालुक्यातील एक, मुल तालुक्यातील 11, कोरपना तालुक्यातील दोन, ब्रह्मपुरी तालुक्यातील 12, वरोरा तालुक्यातील तीन,भद्रावती तालुक्यातील 16, सिंदेवाही तालुक्यातील सात, राजुरा तालुक्यातील सात, गडचिरोली येथील तीन तर यवतमाळ येथील एक असे एकूण 137 बाधित पुढे आले आहे.
या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:
चंद्रपूर शहर व परिसरातील सरकार नगर, विठ्ठल मंदिर वार्ड, इंदिरानगर, घुटकाळा वार्ड, नगीना बाग, म्हाडा कॉलनी परिसर, हनुमान नगर तुकुम, बाबुपेठ, ऊर्जानगर, मित्र नगर, सिव्हिल लाइन, घुग्घुस, पडोली, चोर खिडकी परिसर, निर्माण नगर, दुर्गापुर, जटपुरा गेट, रामनगर, कृष्णनगर, पंचशील चौक, सिस्टर कॉलनी परिसर, महाकाली वार्ड, नकोडा, सौगात नगर, दादमहल वार्ड, विद्या नगर वार्ड, भिवापूर वार्ड भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.
ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:
पोंभुर्णा तालुक्यातील मोहाळा भागातून बाधित पुढे आले आहे. बल्लारपूर तालुक्यातील बामणी, विवेकानंद वार्ड, विद्या नगर वार्ड, बालाजी वार्ड, राणी लक्ष्मी वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.
चिमूर तालुक्यातील आझाद वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे. मुल तालुक्यातील वॉर्ड नंबर वार्ड नंबर 7, वार्ड नंबर 14, वार्ड नंबर 15, वार्ड नंबर 17 परिसरातून बाधित ठरले आहे.
कोरपना तालुक्यातील गडचांदूर भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. वरोरा तालुक्यातील शिवाजी वार्ड, पद्मालय नगर भागातून बाधित पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील गुजरी वार्ड, शेष नगर, विद्यानगर, गांधी नगर, कोरंबी, हनुमान परिसरातून बाधित ठरले आहे.
भद्रावती तालुक्यातील चंडिका वार्ड, पंचशील नगर, मोहाबळा, गुरु नगर, आंबेडकर वार्ड, शिवाजीनगर, सुरक्षा नगर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर, नवरगाव परिसरातून बाधित ठरले आहे. राजुरा तालुक्यातील चुनाळा, उपरवाही, गांधी चौक भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.
00000
0 comments:
Post a Comment