Ads

गॅस सिलिंडर दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक*:चूल पेटवून थापल्या हातावर भाकरी
गॅस सिलिंडर दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक*:चूल पेटवून थापल्या हातावर भाकरी


बस करो अब मोदी सरकार
बहोत हुई महंगाई की मार!

चंद्रपूर :- दिनचर्या न्युज
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्यामुळे आज चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या नेतृत्वात गांधी चौकात केंद्रातील भाजप सरकारकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला व चौकात चुली पेटवून हातावर भाकरी थापत थाळी वाजवून गॅस दरवाढी विरोधात
"वाढलेला गॅस कोंडतोय सर्वसामान्यांचा श्वास!

"धोरण मोदींचे मरण सर्वसामान्यांचे !

मोदीजी नाहि चाहीये अच्छे दिन लौटा दो हमारे बुरे दिन !

असे नारे देत निषेध नोंदवविण्यात आला .

यावेळी महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके म्हणाल्या
गॅस सिलिंडरच्या दरातील वाढ ही गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक असून त्याच्याबरोबर पेट्रोल आणि डिझेलमध्येही सातत्याने वाढ होत आहे. दरवाढीचा हा त्रास गृहिणींनाच जास्त होत आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांची आर्थिक आवक मंदावली असतानाच केंद्र सरकार मात्र दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये दरवाढ करून त्यांची गळचेपी करत आहे. गरिबांच्या खिशावर डल्ला मारण्याचे काम केंद्र सरकार जाणीवपूर्वक करत आहे, असा आरोपही बेबीताई उईके यांनी केला

सरकारने रेशन दुकानात मिळणारे रॉकेलही बंद केल्याने गरीब व मध्यमवर्गीय जनतेला गॅस सिलिंडरशिवाय पर्याय उरलेला नाही. खुल्या बाजारातील रॉकेल ७० रुपये प्रतिलिटरने खरेदी करावे लागते. त्यामुळे सामान्य नागरिकांना जगणे मुश्कील झाले आहे. अनुदानित सिलिंडरची संख्यादेखील कमी आहे. दर महिन्याला सरकार ही दरवाढ करू लागले आहे. त्यामुळे दरवाढ त्वरित रद्द करून गॅस सिलिंडरची किंमत पूर्ववत करावी, अशी मागणीही त्यांनी केली यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल डी के आरिकर मितेश मानकर दिलीप रिगणेजिल्हासचिव हर्षा खैरकर जिल्हासहसचिव शोभा घरडे शाहजादि अन्सारी अर्चना बुटले राणी रॉय स्वेता रामटेके सरस्वती गावनडे नंदा शेरकी सुमित्रा वैद्य नीलिमा नरवडे यांची उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment