नाभिकांच्या सलून दुकानातुन कोरोना होतो का? सरकारने पाठीवर मारावे, पोटावर मारू नये!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
लॉकडाऊच्या ऐवजी कडक निर्बध जाहीर करीत असताना "सलून दुकाने बंद ठेवावी" या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचा सर्व महाराष्ट्रातील नाभिक समाज जाहीर निषेध करीत आहोत.
हातावर पोट असलेला नाभिक समाज कोरोना कारणामुळे पूर्तता अडचणीत सापडलेला आहे. त्यामुळे अनेकांचे ग्राहक पहिलेच कमी झाले आहे.
'कोरोनाच्या भीतीमुळे ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे गेले वर्षभर आमचा समाज पूर्तता हवालदिल झाला आहे ,
आर्थिक समस्यांना कंटाळून मागील लॉकडाऊन काळात आमच्या 16 ते 17 बांधवांनी आत्महत्ये सारखे टोकावर पाऊल उचलून आपले जीवन यात्रा संपविले आहे आम्ही नाभिक समाजआपल्या सरकारकडे वारंवार आर्थिक मदतीची निवेदन देऊन ही आपण आता पर्यत कसलीही दखल घेतलेली नाही .सरकारने पाठीवर मारावे, पण पोटावर मारू नका! सलून दुकानदारवर त्याच्या एकाची नाही तर त्याचा अख्ख्या कुंठुबाची जबाबदारी असते.
अनेकांनी या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांना भूकमारीची पाळी येणार आहे.
दुकानांचा किराया, बॅंकेचे कर्ज, घरभाडे, लाईट बिल, आरोग्याचा खर्च, कसे काय करायचे यांच्या सरकारने विचार करावा!
नाही तर प्रत्येक सलून दुकानदाराला प्रथम सरकारने आर्थिक पॅकेज 10 ते 15 हजारांची मदत द्यावी. नाहीतर समाजावरील तुघलीक लादलेला निर्णय मागे घ्यावा. वाहतूकीवर, तसेच काही व्यवसायावर आपण जसे कडक निर्बंध लावून परवानगी दिली तसेच निर्बंध लावून सलून दुकान सुरू करण्याची परवानगी द्यावी.
नाभिक समाजाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या सर्व आदेश काटेकोर पालन करून शासनास नेहमीच सहकार्य केले असून आजवर आमच्या सलून व ब्युटी पार्लर व्यवसायातून संसर्ग झाल्याचे ऐकायला आले नाही. तरी, सलून व्यवसायावर हा अन्याय का ?
आम्ही शासनाच्या नियमानुसार जरूर सलून दुकाने बंद ठेवू,
मात्र आम्ही आमच्या कुटुंबाला जिवंत ठेवायचं कसं ??
आपल्या कुटुंबा साठी जीव धोक्यात घालून प्रामाणिक पणाने काम करणाऱ्या नाभिक समाजाचे सलून आणि ब्युटी पार्लर बंद करून जर खरेच कोरोना संपेल का? मग बाकी व्यवसायातून कोरोना थांबला का?या आघाडी सरकारने कोणाला सावत्र तर कोणाला आपला अशी भुमिका घेवू नये.
महाराष्ट्रातील 40 लाख्याच्या वर नाभिक समाज बांधवांन वर लाकडाऊनच्या नावा खाली अन्याय होत असेल तर, हा समाज कधीही सहन करणार नाही.
तसाही हा नाभिक समाज कोरोणा संसर्गाने जरी मेला नसला तरी, आपल्या निर्णयाने उपासमारीने मरणार यात शंकाच नाही!
हा निर्णय अन्यायकारआहे . दुदैव एवढे आहे .नाभिक समाजाकडून महसूल मिळत नसल्यामुळे या समाजाकडे दुर्लक्ष होत आहे.
पुन्हा लॉक डाऊन लादून समाजावर उपासमारीची वेळ येणार आहे.
त्यामुळे या अन्याय कारक
निर्णयाचा विरोध करण्यासाठी समाजावर नाईलाजाने रस्त्यावर उतरण्याची वेळ येईलआणि याची सर्व जबाबदारी सरकारवर असेल .
0 comments:
Post a Comment