Ads

अबब.. आज बाधितांचा आकडा पाचशेच्या जवळपास..




अबब.. आज बाधितांचा आकडा पाचशेच्या जवळपास

गत 24 तासात 259 कोरोनामुक्त
492 पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू

आतापर्यंत 26,412 जणांची कोरोनावर मात
ॲक्टीव पॉझिटिव्ह 3009

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, दि. 06 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 259 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 492 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 29 हजार 863 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 26 हजार 412 झाली आहे. सध्या 3009 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 85 हजार 598 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 51 हजार 801 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यामध्ये जीवती येथील 61 वर्षीय पुरूष व उर्जानगर, चंद्रपूर 43 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 442 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 402, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.492 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 159, चंद्रपूर तालुका 54, बल्लारपूर 27, भद्रावती 103, ब्रम्हपुरी 27, नागभिड 20, सिंदेवाही पाच, मूल 11, सावली दोन, गोंडपिपरी दोन, राजूरा सहा, चिमूर 18, वरोरा 27, कोरपना 22, जीवती एक व इतर ठिकाणच्या आठ रुग्णांचा समावेश आहे.
नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

दिनचर्या न्युज
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment