Ads

*भद्रावतीचे आर्य वैश्य महिला भजन मंडळ रंगले नऊ दिवस नऊ रंगात*


भद्रावती,(तालुका प्रतिनिधी):-

      नवरात्राचा धार्मिक उत्सव म्हणजे महिलांसाठी एक पर्वणीच असतो. हा उत्सव मोठ्या उत्साहाने आणि तितक्याच भक्ती भावाने साजरा केला जातो.हा उत्सव भद्रावती शहरातील आर्य वैश्य महिला भजन मंडळाने आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करुन कौतुकाची थाप मिळविली आहे.
      येथील आर्य वैश्य महिला भजन मंडळाने नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या परिधान करून महिषासुर मर्दिनी देवीचे नऊ दिवस स्तोत्र पठण केले. हे स्तोत्र पठण मंडळाच्या प्रत्येक सदस्याच्या घरी सर्व सदस्यांनी मिळून करण्यात आले. मंडळाचा हा उपक्रम मागील पाच वर्षांपासून चालू आहे. त्यांच्या या उपक्रमाचे भद्रावती शहरात अभिनंदन केले जात आहे.
      यंदाच्या या उपक्रमात मंडळाच्या स्वाती उपलंचिवार, सारिका पदमावार, भाग्यश्री दैदावार, ममता उपलंचिवार, नम्रता गुंडावार, मंदा गुंडावार, मानसी बोटुवार, अनिता कोटगिरवार, सारिका गुंडावार, ज्योती गुंडावार, प्रिया भास्करवार, निता गुंडावार सहभागी झाल्या होत्या.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment