Ads

*आमदार किशोर जोरगेवार यांच्या विनंती नंतर रोजगार निमिर्तीसाठी जिंदल गृप खाजगी विमानाने चंद्रपूरात*


चंद्रपुर :-
उद्योगातून रोजगार निर्मिती यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. याकरिता ते  जिंदल स्टिल अॅण्ड पॉवर लिमिटेडचे सी.ओ.ओ. डी. के सरोगी यांच्या संपर्कात होते. अखेर ते जिंदल स्टिल  अँँड   पॉवर लिमिटेडच्या गृपसह खाजगी विमानाने चंद्रपूरात पोहचले यावेळी त्यांच्या सोबत जिंदल स्टिल अॅण्ड पॉवर लिमिटेडचे जि. एम एस.एस नागी, स्टिल अॅण्ड पॉवर लिमिटेड उपाध्यक्ष बि.ए. राजू, यांचीही उपस्थिती होती. या प्रसंगी एमइएलच्या विश्रामगृहात आमदार किशोर जोरगेवार यांच्यासोबत त्यांनी जवळपास तासभर चर्चा केली. एखाद्या मोठ्या कंपनीचा अधिकारी खाजगी विमानाने चंद्रपूरात पोहचल्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याचे बोलल्या जात आहे. यावेळी विदर्भ इंडस्ट्रीअलचे अध्यक्ष मधूसूदन रुंगठ्ठा, विदर्भ इकॉनॉमी डेवलप्मेंड कौन्सिलचे उपाध्यक्ष प्रदिप माहेश्वरी यांचीही प्रामुख्यतेने उपस्थिती हो
     एखादा उद्योग सुरु करण्यासाठी लागणारे सर्व संसाधन चंद्रपूरात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र प्रबळ ईच्छाशक्तीच्या अभावामूळे चंद्रपूरात अपेक्षित अशी उद्योग वाढ झालेली नाही. याचा परिणाम येथील रोजगारावर झाला असून एकेकाळी रोजगार देणारा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्हातील युवकांनाच आता रोजगाराच्या शोधात इतरत्र जावे लागत आहे. त्यामूळे ही परिस्थिती बदलवून पून्हा चंद्रपूर जिल्हाला रोजगार देणारा जिल्हा म्हणून गौरव प्राप्त करुन देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. या करिता ते देशातील मोठ्या उद्योजकांच्या संपर्कात असून उद्योग वाढीतून चंद्रपूरात रोजगाराच्या संद्या उपलब्ध व्हाव्यात या दिशेने त्यांचे प्रयत्न सुरु आहे.
देशात तिस-या क्रमांकाचे असलेले स्टिल उत्पादक जिंदल स्टिल  अँँड   पॉवर लिमिटेडने चंद्रपुरात उद्योग सुरु करावा यासाठी आ. जोरगेवार जिंदल स्टिल अॅण्ड पॉवर लिमिटेडचे सी.ओ.ओ.डी. के सरोगी यांच्याशी संपर्कात होते. यात त्यांना विदर्भ इंडस्ट्रीअलचे अध्यक्ष मधूसूदन रुंठ्ठा महत्वाचे सहकार्य लाभले.  आमदार किशोर जोरगेवार यांचा सातत्याचा सुरु असलेला पाठपूरावा पाहता अखेर गुरुवारी डी. के सरोगी हे आपल्या ग्रुपसह खाजगी विमानाने चंद्रपूरात दाखल झाले. यावेळी त्यांनी चंद्रपूरातील फेरो अलॉय प्लाँट पाहण्याची ईच्छा व्यक्त केली. त्यांनतर आ. जोरगेवार यांच्या शिष्ट मंडळाने सदर प्लाँट दाखविला यावेळी त्यांनी पूर्ण प्लाँटचे निरिक्षण केले. त्यांनतर येथीलच विश्रामगृहात त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत जवळपास तासभर चर्चा केली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरातील खनिज संपत्ती व भौगोलीक स्थितीची त्यांना माहिती दिली. याप्रसंगी विदर्भ इंडस्ट्रीअलचे अध्यक्ष मधूसूदन रुंठ्ठा, विदर्भ इकॉनॉमी डेवलप्मेंड कौन्सिलचे उपाध्यक्ष प्रदिप माहेश्वरी, एम ई एल चे नरेश शर्मा,  अजय जयस्वाल, पंकज गुप्ता, ललीत कासट यांची उपस्थिती होती. या भेटी दरम्याण अनेक महत्वाच्या विषयावरही सकारात्मक चर्चा झाली. यावेळी सरोगी यांनी समाधान व्यक्त करत त्यांच्या रायगड येथील प्लांटला  विदर्भातील उद्योजगांनी भेट देण्याचे निमंत्रन दिले. या भेटीमूळे भविष्यात जिंदल स्टिल अॅण्ड पॉवर लिमिटेड चंद्रपूरात उद्योग सुरु करेल अशी आशा निर्माण झाली आहे. असे झाल्यास चंद्रपूरात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला आहे. या भेटीसाठी विदर्भ इंडस्ट्रीअलचे अध्यक्ष मधूसूदन रुंगठ्ठा यांचेही महत्वपूर्ण सहकार्य लाभले आहे. ते चंद्रपूरचे अध्यक्ष असतांना त्यांनी उत्तम कार्य केले आहे. ते आता विदर्भाच्या कमेटीवर आहे. याचाच भाग म्हणून त्यांनी ही भेट घडवून आणण्यात महत्वाची भुमीका बजावली आहे. तर विदर्भ इकॉनॉमी डेवलप्मेंड कौन्सिलचे उपाध्यक्ष प्रदिप माहेश्वरी हे विदर्भाच्या उदयोगाची इंतभ्युत माहिती असणारे व्यक्ती आहे असे सांगत यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांच्याबदल गौरत्गार काढले. यापूढे मधूसुदन रुंगठ्ठा आणि प्रदिप माहेश्वरी हे विदर्भाच्या उद्योगासाठी करत असलेल्या कामात मी त्यांच्या पाठिशी राहणार असल्याचेही आ. जोरगेवार यावेळी म्हणाले

*जिंदल स्टिल अँँड पॉवर लिमिटेडचे देशासह विदेशातही प्लाँट*

जिंदल स्टील अँड पॉवर लिमिटेड ही नवी दिल्ली भारत येथे स्थित एक भारतीय स्टील आणि ऊर्जा कंपनी असून कंपणीची अंदाजे 40 हजार कोंटीची उलाढाल आहे. जिंदल गट वैविध्यपूर्ण अश्या रासायनिक, पोलाद, वीज, खाण, तेल, वायू आणि पायाभूत सुविधांमध्ये अग्रेसर आहे. कंपनी स्वतःच्या कोळसा आणि लोहखनिज खाणींच्या माध्यमातून स्टील आणि वीज निर्मिती करते सदर कंपणीचे प्लाँट देशासह दक्षिण ऑफ्रिका, मॉरेशियस, बोलीविया, ऑस्ट्रिलीया, मोझांबिक या देशात आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment