Ads

*केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनानंतर बरांज कोळसा खाण बंद आंदोलन मागे*


भद्रावती,दि.१६(तालुका प्रतिनिधी):-

      महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री तथा विधीमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात दि.१३ ऑक्टोबरपासून पुकारण्यात आलेले  भद्रावती तालुक्यातील बरांज (मोकासा) येथील कर्नाटका एम्टा कोळसा खाण बंद आंदोलन अखेर आज शनिवारी केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी पत्रपरिषदेत दिली.
       बरांज येथील कोळसा खाणीच्या प्रकल्पग्रस्तांना आणि कामगारांना न्याय मिळावा यासाठी आ.सुधीर मुनगंटीवार यांनी कर्नाटका एम्टा कंपनीच्या विरोधात खाण बंद आंदोलन सुरू केले होते.त्यात भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, खाण प्रकल्पग्रस्त, कामगार मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.आंदोलकांनी खाण कामगारांना जुने व चालू वेतन देण्यात यावे, उर्वरित प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यात यावी, करारनाम्यानुसार प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्यात यावा, खाजगी कंत्राटदारांची थकबाकी देण्यात यावी आदी मागण्यांना घेऊन आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू होते. त्यामुळे खाण बंद होती. दरम्यान आ.मुनगंटीवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याशी चर्चा केल्यानंतर आ.मुनगंटीवार यांना आठ दिवसांत दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठक घेऊन करारनाम्यातील मागण्या पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले. तसे  लेखी पत्र केंद्रीय कोळसा मंत्र्यांचे खाजगी सचिव डाॅ.होन्नारेड्डी एन.यांनी आ.मुनगंटीवारांना दिले. त्यामुळे हे गाणं बंद आंदोलन मागे घेण्यात आल्याचे देवराव भोंगळे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
      मात्र जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत २१७ पैकी कोणीही कामगार कामावर जाणार नाही असेही ठरले असल्याचे त्यांनी सांगितले.१२०० शेतक-यांचा हा विषय होता. आमच्या आंदोलनाची जिल्ह्यानेच नाही तर देशाने दखल घेतली असल्याचे भोंगळे यांनी यावेळी सांगितले. आ.सुधीर मुनगंटीवार यांचे नेतृत्व आणि भाजपाचे कार्यकर्ते आणि प्रकल्पग्रस्त गावातील नागरिक यांच्या सहकार्यामुळेच हे आंदोलन यशस्वी झाल्याचे भोंगळे यांनी यावेळी सांगितले.
      पत्रपरिषदेला भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत गुंडावार, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले,जिल्हा सचिव सुनील नामोजवार, तालुका महामंत्री नरेंद्र जीवतोडे,  जि.प.सदस्या अर्चनाताई जीवतोडे, भद्रावती पंचायत समिती सभापती प्रवीण ठेंगणे, जिल्हा भाजयुमो महामंत्री इम्रान खान, जि.प.सदस्य प्रवीण सूर, अनिल डोंगरे, दीपक बोढे, शहर अध्यक्ष प्रवीण सातपुते, शहर महामंत्री किशोर गोवारदिपे, नगरसेवक प्रशांत डाखरे,माधव बांगडे, संजय राॅय, सत्तारभाई, संजय ढाकणे, गजानन कामतवार, अनंता मांढरे, सुनील खारकर उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment