ऐन दसरा या सणाच्या दिवशीच भद्रावती तालुक्यातील कुडरारा या गावाला अंधारात राहावे लागल्याने या गावातील नागरिकांनी विद्युत वितरण कंपनी विरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून कुडरारा-गोरजा गट ग्रामपंचायतीच्या उपसरपंच श्रावणी प्रफुल घोरुडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
कुडरारा येथे ६ महिन्यांपूर्वी घोडपेठ येथून विज जोडण्यात आली. शासनाने लाखो रुपये खर्च करून विज जोडणी केली. विज वितरण कर्मचाऱ्यांना योग्य निदान करता यावे म्हणून ही योजना करण्यात आली. परंतु त्याचा योग्य उपयोग करता येत नाही. घोडपेठ हे गाव भद्रावती पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे केंद्रबिंदू आहे.त्या गावचा विजपुरवठा चालू करुन कुडरारा हे गाव अंधारात ठेवले. हे कितपत योग्य आहे. असा सवालही उपसरपंच श्रावणी घोरुडे यांनी विचारला आहे. जंपरला लाॅक लावून विज कर्मचाऱ्याने अंधारात ठेवले.याला जबाबदार कोण अधिकारी की कर्मचारी ? असा सवालही उपसरपंच श्रावणी घोरुडे यांनी उपस्थित केला आहे. हा विजेचा लपंडाव थांबविण्यात यावा अशीही मागणी घोरुडे यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment