Ads

प्राध्यापिकेच्या तक्रारीवरून दोन्ही प्राचार्यांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल


चंद्रपूर :- 
चंद्रपूर : बल्लारपूर येथील बहुचर्चित बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (बीआयटी) मध्ये पीडित प्राध्यापिकेने घटना घडल्यानंतर बल्लारपूर पोलीस स्टेशनला ६ तारखेला तक्रार देण्यासाठी गेले असता बल्लारपूर पोलिसांनी तक्रार चौकशी साठी ठेवली होती, पोलिसांच्या चौकशीनंतर त्या दोन प्राचार्य विरोधात बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

वर्ष 2019 ला सुद्धा अशीच घटना BIT Ballarpur महाविद्यालयात घडली होती, मात्र त्यावेळी महाविद्यालय व्यवस्थापनाने महिला सुरक्षा समितीकडे प्रकरण वळते केले होते, याबाबत पोलिसात तक्रार सुद्धा करण्यात आली नव्हती. मात्र पुन्हा 2 वर्षांनी हा प्रसंग घडल्याने महाविद्यालय व्यवस्थापन संशयाच्या घेऱ्यात आले आहे. जर त्यावेळी योग्य कारवाई झाली असती तर आज त्या महिला प्राचार्य वर ती वेळ आली नसती. 

दोन प्राचार्यांविरुद्ध महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून बल्लारपूर पोलीस ठाण्यात विनयभंगासह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बामणी येथील बीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात २ प्राचार्यांवर एका शिक्षिकेचा विनयभंग Debauchery व जीवे मारण्याची धमकी अंतर्गत बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकरण बामणी येथील बीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील असून दि. ६ ऑक्टोबरला अभियांत्रिकीचे प्राचार्य रजनीकांत मिश्रा व पॉलिटेक्निकचे प्राचार्य श्रीकांत गोजे (रा. बल्लारपूर ) यांनी महाविद्यालयातील एका शिक्षिकेवर विद्यार्थ्यांना आमच्या विरोधात भडकवतात यावरून भांडण केले. या भांडणात दोन्ही प्राचार्याने शिक्षिकेचा हात ओढला व विनयभंग केला, असा आरोप शिक्षिकेने केला आहे.

सदर प्रकरणी पोलिसात तक्रार न देण्याची समज इतर स्टाफ तर्फे शिक्षिकेला देण्यात आली. व शिक्षिकेला आपल्या गावी पाठविण्यात आले.  त्यानंतरही प्राचार्य तर्फे शिक्षिकेला अश्लील मेसेज Pornographic messages आणि जीवे मारण्याची मारण्याची धमकी देत होते. शेवटी दिनांक १७ ऑक्टोबरला ( रविवारला) शिक्षिकेने दोन्ही प्राचार्या विरुद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार केली.

पिडीत प्राध्यापिकेच्या तक्रारीवरून दोन्ही प्राचार्यांविरुद्ध विनयभंग व जीवेमारण्याच्या धमकी अंतर्गत ३५४, ३५४ (अ), ३५४ (अ) (१) (आय) ३५४(ब), ३५४ (५), ५०६,५०९,३२३ भादवी गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय प्रमोद रासकर करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment