भद्रावती रोटरी क्लब व नगर परिषद भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक हुतात्मा स्मारक येथे दिनांक 18 ला covid-19 लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये 148 जणांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरण न झालेल्यांनी त्वरित लसीकरण करून घ्यावे याबाबत आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच शासनातर्फे सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्ष यांना लसीकरण शिबिर मोठ्या प्रमाणात घेण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून रोटरी क्लब भद्रावती ने भद्रावती नगर परिषदेच्या माध्यमातून सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, तहसीलदार डॉ.निलेश खटके, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, रोटरी क्लब भद्रावती चे अध्यक्ष सचिन सरपटवार, सचिव अब्बास अजानी, कोषाध्यक्ष मदन ताठे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लब भद्रावतीचे सदस्य भाविक तेलंग ,डॉक्टर माला प्रेमचंद ,डॉक्टर अमित प्रेमचंद प्रवीण महाजन, विनोद का मडी , ॲड युवराज धानोरकर, ज्ञानेश्वर हटवार,आनंद क्षीरसागर ,किशोर खंडाळकर , प्रकाश पिंपळकर, विवेक अकोजवार ,सुनील पोटदुखे , सुधीर पारोधे, , शंकर डे व रोटरी क्लबचे सर्वच सदस्य तसेच भद्रावती नगर परिषदेच्या प्रवीना चटकी, दिव्यांनी बगडे, ज्योती पेंदोर व रफीया शेख यांचे सहकार्य लाभले.
0 comments:
Post a Comment