चंद्रपुर :- जिल्हा सामान्य रुग्णालयातील सोनोग्राफी कक्ष बंद असल्याने बाहेर गावातून आलेल्या रुग्णांना अडचण येत असल्याची तक्रार प्राप्त होताच यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठून अधिका-यांशी चर्चा करत सदर सोनोग्राफी कक्ष रुग्णांसाठी सुरु केले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संघटक पंकज गुप्ता, राशिद हुसेन, करणसिंह बैस, गौरव जोरगेवार यांच्यासह इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील भोंगळ कारभार पून्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. येथील सोनोग्राफी कक्ष हे अधून मधून नेहमी बंद राहत असल्याने रुग्णांना मोठा त्रास सहण करावा लागत आहे. असाच काहीसा प्रकार शणिवारी रात्री पून्हा एकदा समोर आला आहे. गडचांदूर, जिवती, वरोरा येथील काही रुग्ण सोनोग्राफी करिता जिल्हा सामान्य रुग्णालयातील सोनोग्राफी कक्षात पोहचले मात्र सदर कक्ष बंद असल्याने त्यांना तासनतास प्रतिक्षा करावी लागली. अखेर या बाबतची तक्रार एका रुग्णाने आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडे केली. त्यानंतर आ. जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्त्यांना रुग्णालयात जाण्याच्या सुचना केल्यात. यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्ते रुग्णालयात पोहचल्या नंतर सदर कक्ष बंद असल्याचे निदर्शनास आले. यावेळी कक्षाबाहेर रुग्णांच्या रांगा दिसून आल्या. या प्रकाराबाबतची माहिती यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्त्यांनी निवासी वैद्यकीय अधिकारी भास्कर सोनारकर यांना दिली. मात्र त्यांनाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्त्यांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. अशोक नितनवरे यांच्याकडे तक्रार करत जोवर सदर कक्ष सुरु होत नाही तो पर्यंत येथून हलणार नाही असा पवित्रा घेतला. त्यांनतर अधिष्ठाता यांनी संबंधितांना सांगून सोनोग्राफी कक्ष रुग्णांसाठी सुरु केला. त्यानंतर रुग्णांची सोनोग्राफी करण्यात आली. यावेळी रुग्णांनी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.
0 comments:
Post a Comment