सावली ( प्रतिनिधी ):-राज्याचे बहुजन कल्याण, मदत व पुर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विजय भाऊ वडेट्टीवार यांचेकडून मौजा निमगाव येथील कॅन्सरग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत देण्यात आली
मौजा निमगाव येथे वनिता ताराचंद सोनूले, यशवंत चिंतामण लाकडे, पार्वती ईश्वर करपते, या कॅन्सर या आजाराने आजारी होत्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची. दरम्यानच्या काळात पालकमंत्री नामदार विजय भाऊ वडेट्टीवार यांना मौजा निमगाव येथील येथील काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी सदर बाब लक्ष्यात आणून दिली होती. पालकमंत्री नामदार विजय भाऊ वडेट्टीवार यांनी तत्काळ आर्थिक मदत पाठविली.
सदर आर्थिक मदत अंतरगाव निमगाव जिल्हा परिषद क्षेत्राच्या सदस्या वैशाली ताई शेरकी, निमगावच्या प्रथम नागरिक सौ गीता लकेश लाकडे, गावचे उपसरपंच राजू पाटील ठाकरे यांचे हस्ते देण्यात आली
यावेळी सावली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीन गोहणे, कृषी उत्पन्न बाजार समिती सावलीचे सभापती हिवराज पाटील शेरकी, कृषी उत्पन्न बाजार समिती सावलीचे संचालक सुरेश हुलके, पुरुषोत्तम पालोजवार,ताराचंद सोनूले, लकेश लाकडे, उपस्थित होते
सावली तालुका काँग्रेस ची सुरेश हुलके यांचे घरी सात्वनपर भेट
दरम्यान मौजा निमगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश हुलके यांचा मुलगा नामे भास्कर सुरेश हुलके यांचा दिनांक 14 ऑक्टोबर 2021 ला अपघातात मृत्यू झाला होता, मृतक भास्कर हुलके यांना दोन लहान मुलगे अनुक्रमे 4 वर्षे, व दोन वर्षे आहेत. घरचा कमावता पुरुष गेल्यामुळे चिंतेचे वातावरण. गावात सर्वत्र चिंतेचे वातावरण. घरची आर्थिक परिस्थिती बेताची. त्यामुळे सावली तालुका कॉंग्रेस कमिटीने मृतक भास्कर हुलके यांचे घरी भेट देऊन कुटूंबियांचे सांत्वन केले व पुढील भविष्यासाठी रोशनी भास्कर हुलके यांना आर्थिक मदत देण्यात आली
0 comments:
Post a Comment