एसटी महामंडळाचे राज्य शासन स्तरावर विलीनीकरन करून राज्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे वेतन व अन्य सर्व सुविधा एसटी कर्मचाऱ्यांनाही लागु करावे या प्रमुख मागणीसह महागाई भत्ता, गृह भाडे भत्ता, वेतनवाढ, बोनस व दिवाळी भत्ता आदी मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण व संपाचे पाऊल उचलले आहे. दिवाळीच्या ऐन तोंडावर हे आंदोलन सुरू असल्याने सर्वसामान्य नागरीक व चाकरमान्यांना सणासुदीच्या दिवसात प्रवास करणे कष्टप्रद ठरत असल्याने राज्य शासनाने या आंदोलनकारी कर्मचाऱ्यांचा अधिक अंत न बघता त्यांच्या न्याय मागण्यांबाबत तातडीने निर्णय घेवून हा संप संपुष्ठात आणावा असे आवाहन हंसराज अहीर यांनी केले आहे.
अत्यल्प वेतनावर कार्य करणाऱ्यां या कर्मचाऱ्यांव्दारे आत्महत्या सारखे पाऊल उचलले जात आहे, हा अतिशय दुर्दैवी प्रकार असुन विविध उद्योगांमध्ये ठेका पध्दतीवर कार्य करणाऱ्यां कामगारांपेक्षाही या एसटी कर्मचाऱ्यांना कमी वेतन मिळतो हा प्रकार अन्यायी व अत्यंत लाजीरवाणा असल्याचेही हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.
शासनाने त्यांच्या मागण्यांबाबत त्वरीत निर्णय घेवून त्यांचे शोषण थांबवावे व राज्य कर्मचाऱ्यांना देय असलेले सर्व भत्ते व अन्य सुविधा एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना लागु करण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा असेही अहीर यांनी प्रसिध्दीपत्राकात म्हटले आहे.
0 comments:
Post a Comment