भद्रावती (तालुका प्रतिनिधि):- लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथील अकरावी वर्गातील 16 वर्षीय विद्यार्थी रोहित रवींद्र नागपुरे याची भारत देशाबाहेरील दुबई या देशाच्या शारजहा येथे क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली. तो 8 नोव्हेंबरला रवाना होणार आहे.
लोक सेवा मंडळ संचालित लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय तर्फे रोहित नागपूरे याचा नुकताच सत्कार करण्यात आला. याप्रसंगी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, सहसचिव नामदेव कोल्हे, सदस्य गोपाल ठेंगणे ,प्राचार्य बंडू दरेकर व सचिन सरपटवार उपस्थित होते.
यापूर्वीसुद्धा लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या महिला खेळाडूंनी राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत राज्य संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
Rohit Nagpure felicitated at Lokmanya Junior College
0 comments:
Post a Comment