Ads

महात्मा ज्‍योतीबा फुले समाज सुधारक मंडळाच्‍या पदाधिका-यांच्‍या प्रयत्‍नाने थॅलेसेमिया आजार असलेल्‍या बालकास रू. २ लाखाची आर्थिक मदत

चंद्रपुर :-
चि. आर्यन प्रशांत ठाकरे, वय ६ वर्ष, रा. नगीनाबाग चंद्रपूर या बालकास जन्‍मताच थॅलेसेमिया हा रक्‍ताचा दुर्धर आजार जन्‍मताच झाला आहे. तेव्‍हा पासून हा आजार आर्यनचे वडील प्रशांत ठाकरे यांच्‍या लक्षात आले असता या परिवारावर दुःखाचा डोंगरच कोसळलेला आहे. अशाही परिस्थितीत प्रशांत ठाकरे हे न डगमगता मोठया धैर्याने पुढे येवुन या बालकास जिवनदान द्यायचेच या धेयाने त्‍याला दर २० दिवसांनी त्‍याच्‍या रक्‍तगटाचे रक्‍त त्‍यास शासकीय रूग्‍णालय चंद्रपूर येथे देत होते. परंतु हा या आजाराचा कायमचा उपचार नसुन केवळ जीव वाचविण्‍याचा प्रयत्‍न होता.
अशातच त्‍याला डॉक्‍टरांनी सांगीतले की आर्यनचा बोनमॅरो ट्रान्‍सप्‍लॉनटेशन झाले तर तो कायमचा बरा होवु शकेल असे लक्षात आल्‍यावर प्रशांत ठाकरे यांनी त्‍या दिशेने प्रयत्‍न केले असता क्राईस्‍ट हॉस्‍पीटल वेल्‍लोर (तामिडनाडू) येथील रुग्‍णालयाला भेट देवुन चि. आर्यनच्‍या रक्‍ताचे सर्व रिपोर्ट बघुन बोनमॅरो ट्रान्‍सप्‍लॉनटेशन करण्‍याचे ठरले. त्‍याकरीता त्‍याला रू. १५ लाखाची आवश्‍यकता असल्‍याचे डॉक्‍टरांनी सांगीतले असता थॅलेसेमिया या आजाराच्‍या रुग्‍णाला शासकीय मदत कशा प्रकारे मिळविता येईल यादृष्‍टीने प्रयत्‍न करुन कोल इंडिया कंपनी लिमी. कडून रू. १० लक्ष व प्रधानमंत्री योजनेच्‍या निधीमधून रू. ३ लक्ष असे एकुण रू. १३ लाख जमविले व ते परस्‍पर रुग्‍णालयात जमा झाले. उर्वरित २ ते ३ लाख रुपये समाजबांधवाकडून जमा करावे या उद्देशाने प्रशांत ठाकरे यांनी महात्‍मा ज्‍योतीबा फुले समाज सुधाकर मंडळाचे अध्‍यक्ष रविंद्र गुरनुले, कार्याध्‍यक्ष डॉ. मनोहर लेनगुरे, योगेश निखोडे व अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. सचिन भेदे यांच्‍या सहकार्याने माळी समाजातील दानशुर लोकांकडून व इतरही राजकीय लोकांकडून हा मदत निधी मागून रू. २ लाख प्रशांत ठाकरे यांना दि. १३.१०.२०२१ ला म. ज्‍योतीबा फुले समाज सुधारक मंडळाचे उपकार्यालय, नगीनाबाग, चंद्रपूर येथे सर्व दानशुरांच्‍या समक्ष व इतर समाज बांधवांच्‍या उपस्थितीत आर्यनच्‍या पुढील उपचाराकरीता देण्‍यात आले.

ही मदत निधी मिळविण्‍याच्‍या कार्यात डॉ. संजय घाटे, डॉ. राकेश गावतुरे, सुरेश कावळे, वसंता चहारे, अजय महाडोळे यांची मोलाची साथ लाभली.

चि. आर्यनच्‍या उपचाराकरीता प्रशांत ठाकरे व त्‍याचा परिवार दि. १५.१०.२०२१ रोजी व्‍हेल्‍लोर येथील हॉस्‍पीटला निघाले आहेत. या प्रसंगी त्‍याला शुभेच्‍छा देण्‍याकरीता सर्व दानशुर डॉ. प्रदिप मोहुर्ले, बंडूजी ठाकरे, एड. नारायण गुरनुले, वसंता गुरनुले व क्रांती ज्‍योती सावित्रीबाई फुले म‍हिला मंडळ शाखा नगीनाबागच्‍या अध्‍यक्षा सौ. संगीता पेटकुले, कार्याध्‍यक्षा छाया सोनुले,सुरेखा निखोडे, मंगला निकोडे, पुजा पेटकुले, सारुबाई चौधरी, रेखा लेनगुरे, विना पेटकुले,रेखा कावळे या सर्व महिला व समाज बांधवांच्‍या उपस्थितीत आर्यनला शुभेच्‍छा देण्‍यात आल्‍या.
असे म. ज्यो. फुले स. सुधारक मंडळाचे अध्यक्ष रविंद्र गुरनुले यांनी कळविले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment