पट्टेदार वाघिणीचे मृत्यु प्रकरणी एका आरोपीला अटक .
भद्रावती (तालुका प्रतिनिधि):-दिनांक 11/11/2021 रोजी चंद्रपुर वन विभागातील भद्रावती परिक्षेत्रातील मधील बिट वनरक्षक पावना यांनी त्यांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने श्री. गजेंद्र हरिचंद्र रणदिवे यांचे शेतामध्ये पट्टेदार वाघ (मादी) 1 नग वय अंदाने 2 ते 26 वर्ष मृत अवस्थेत असल्याबाबतची माहीती वरीष्ठ वनअधिकारी यांना कळविण्यात आली. त्यानुसार वरीष्ठ वनाधिकारी यांनी मौकापळाची पाहणी करून श्री. एन. आर प्रविण, भावसे मुख्य वनसंरक्षक चंद्रपुर वनवृत्त चंद्रपुर, यांचे मार्गदर्शनात मा. श्री. दिपेश मल्होत्रा भावसे विभागीय वन अधिकारी चंद्रपुर वनविभाग चंद्रपुर, यांचे उपस्थीतीत श्री. एच. पी. शेंडे वनपरीक्षेत्र अधिकारी, भद्रावती, डॉ रविकांत एस. खोबरागडे, पशुवैद्यकीय अधिकारी वा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर डॉ. श्री. आर. सी. शेंदे पशुधन विकास अधिकारी वरोरा, डॉ. कुदन पोडचलवार पशुवैद्यकीय अधिकारी TIC चंद्रपूर, श्री. मुकेश आंदककर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपुर तथा WPSI, यांचे प्रतीनीधी, श्री जी धोतरे ईको प्री संस्था तथा एन. टी. सौ. ए. चे प्रतीनीधी व इतर वनकर्मचारी यांचे उपस्थितीत शवविच्छेदन करन अग्निदहन करण्यात आले. तसेच शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्युचे कारण स्पष्ट होईल. प्रथम दर्शनी सदर मृत्यु हा विदयुत तारांच्या प्रवाहाणे झाल्याचे दिसुन आले आहे. सदर प्रकरणी वनगुन्हा नोंदविण्यात आलेला असुन आरोपी श्रो. निळकंठ गोवीदादडमल (शेतमजुर) रा. चंदनखेडा यांना पुढील चौकशी साठी ताब्यात घेण्यात आलेले असुन शेतमालक श्री गजेंद्र हरिचंद्र रणदिवे यांचा शोध घेणे सुरू असून प्रकरणाची पुढील चौकशी सुरु आहे.
0 comments:
Post a Comment