Ads

जनतेला अच्छे दिनाचे खोटे स्वप्न दाखवणाऱ्या मोदी सरकारचा केवळ व्यापारी मित्राला लाभ

Modi government showing false dream of good days to the people only benefits business friends
यवतमाळ : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अर्थव्यवस्था ढासळली आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार देशोधडीला लागला असतांना मोदी सरकारने काही उद्योगपतींना खुश ठेवण्यासाठी देश विकायला काढला असल्याची टीका काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. ते केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसने जनजागृती अभियान सुरु केले. त्याप्रसंगी आर्णी येथे बोलत होते.

यावेळी माजी मंत्री शिवाजीराव मोघे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार डॉ. वजाहत मिर्झा, साजिद बेग, जीवन पाटील, बाळासाहेब मोघे, स्वाती येंडे, किरण मोघे, आरीज बेग, विजय मोघे, कादर इराणी, छोटू देशमुख, राजू विरखेडे, नीता ठाकरे, ज्योती मोरकर, सुनीता भारती, गुणवंत राऊत यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, जनतेला अच्छे दिनाचे खोटे स्वप्न दाखवणारे केंद्रातील मोदी सरकार बेसुमार दरवाढ करून सर्वसामान्यांचे हाल करत आहे, आपल्या निवडक व्यापारी मित्रांना फायदा पोहचविण्यासाठी भाजप सरकार सतत एक वर्ष शेतकऱ्यांचा जीवाशी खेळले, आंदोलन कालावधीत शेकडो शेतकऱ्याचा जीव गेल्यानंतर उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक जवळ येताच पंजाब मधील झालेला भाजपचा दारुण पराभव पाहून स्वतःच लावलेले अन्यायकारक शेतकरी काळे कायदे परत घेऊन शेतकऱ्यांची माफी मागण्याचे सोग करत आहे. या सरकारला सर्वसामान्य जनतेच्या मृत्यूचे काहीही घेणेदेणे नाही, म्हणूनचं कोरोना महामारीचा तडाख्यात आर्थिक खाईत सापडलेल्या नागरिकांना इंधनावर बेसुमार कर लावून पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्य तेल यांच्या किमतीत वाढ केली. सरकारी संस्थांचे खाजगीकरण करत असून महाराष्ट्रातील भाजप नेते खाजगी संस्थांना शासनात विलनीकरण करण्यासाठी एस. टी कर्मचारी समवेत आंदोलन करीत आहे. अशा या दुतोंडी सरकाला जनतेने धडा शिकवावा. असे प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी माजी मंत्री शिवाजीराव मोघे म्हणाले कि, भाजपने देशाला साडेसाती लावली आहे. इंधन दरवाढीमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकरी कायदे आणून शेतकऱ्यांची थट्टा केली. आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कायदे मागे घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. अरीज बेग यांनी प्रास्ताविक केले. अमोल मांगुळकर यांनी संचालन केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment