Ads

ग्राहकांच्या समस्याला मिळणार आता न्याय

तालुका प्रतिनिधी भद्रावती :
ग्राहक पंचायतच्या कार्याची ओळख त्याचे पदाने न होता तो करीत असलेल्या कार्याने व्हावी, कार्यकर्ता कामाने ओळखला जावा, ही ग्राहक पंचायत ची धारणा आहे. ह्या चळवळीतून ग्राहकाला त्याच्या व्याधीतून मुक्ती मिळवून देण्याचे सेवा कार्य करायचे आहे. असे प्रतिपादन चंदनखेडा येथे निवड करण्यात आलेल्या अखिल भारतीय ग्राहक पंचायत कार्यकारिणी निवड प्रसंगी जिल्हा संघटन मंत्री पुरुषोत्तम मत्ते यांनी केले.

संसद आदर्श ग्राम चंदनखेडा येथे दिनांक १४ नोव्हेंबरला अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा कार्यकारिणीचे मार्गदर्शनात तालुका कार्यकारिणीचे माध्यमातून कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. यावेळेस प्रमुख मार्गदर्शक तालुका संघटनमंत्री वसंत वर्हाटे, तालुका अध्यक्ष वामन नामपल्लीवार, सचिव अशोक शेंडे, सहसचिव प्रवीण चिमूरकर, सदस्य सुदर्शन तनगुलवार हे उपस्थित होते.

ग्राहक पंचायत शाखा चंदनखेडा येथील कार्यकारिणी अध्यक्ष पदी सदानंद आगबतनवार, उपाध्यक्ष पदी नयन जांभूळे, सचिव अमोल मुडेवार, सहसचिव निळकंठ महाकुलकर, कोषाध्यक्ष पदी निकेश भागवत, कार्यकारिणी सदस्य पदी विलास झाडे, निलेश बगडे यांची निवड करण्यात आली.

युवा सहभाग असलेल्या या ग्राहक पंचायत कार्यकारिणी चे माध्यमातून ग्राहकांच्या विविध समस्याला न्याय देण्याचे सेवाकार्य होणार असून परीसरातील समस्या ग्रस्त ग्राहकांनी प्रत्यक्ष संपर्क करावा. असे आवाहन नवनियुक्त अध्यक्ष सदानंद आगबतनवार यांनी याप्रसंगी ग्राहकांना केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment