चंद्रपुर :- पारिजात महिला बचत गट दाताळा कडून आज दिवाळीच्या विविध प्रकारच्या फराळाच्या वस्तू व साहित्य विक्री करीता जी.प. परिसरात उपलब्ध करून देण्यात आल्या. आज जिल्हा परिषदेच्या सीइओ डॉ. मिताली शेठी यांनी सदर स्टॉलला भेट देऊन दिवाळी फराळाचे साहित्य विकत घेतले.  डॉ. मिताली सेठी यांनी आम्हाला जि. प. परिसरात आमच्या बचत गटांना स्टॉल लावण्यास तसेच सर्व जि.प. च्या अधिकारी व कर्मचारी यांना बचत गटाच्याच वस्तू व साहित्य खरेदी करण्याचे आव्हान करून महिला बचत गटाच्या आर्थिक उन्नतीसाठी आपले योगदान दिले त्याबद्दल त्यांचे आभार बचत गटाच्या महिला सौ. संगीता ठेंगणे, सीमा विरुटकर, प्रेरणा  यदनूरवार व पिंकी सेलोकर यांनी मानले.
                                        Home
                                      
chandrapur
बचत गट महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी सरसावल्या जीपच्या सीईओ डॉ. मिताली शेठी स्वतः खरेदी केलेल्या विविध वस्तु.. 
Subscribe to:
Post Comments
                            (
                            Atom
                            )
                          
 

0 comments:
Post a Comment