Ads

वेकोलिमध्ये आता प्रकल्पग्रस्तांच्या विवाहित मुलींनाही नोकरीचा अधिकार - हंसराज अहीर

चंद्रपूर :-
वेकोलि प्रकल्पग्रस्तांच्या विवाहित मुलींना नोकरी पासून वंचित ठेवण्याचे धोरण अन्यायकारक असून या धोरणावर पुनर्विचार केला जावा अशी भूमिका पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी वारंवार घेतली होती. वडीलांच्या स्थायी मालमत्तेवर मुलांच्या बरोबरीने विवाहित मुलीचा अधिकार असतांना तीला वेकोलि व्यवस्थापन नोकरीपासून वंचित करण्याचे धोरण स्वीकारत असेल तर हा त्या विवाहित आश्रीतेवर अन्याय असल्याची बाब अहीर यांनी कोळसा मंत्रालय, कोल इंडिया तसेच वेकोलि मुख्यालयाच्या वेळोवेळी निदर्शनास आणुन दिली होती. अहीरांच्या या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर कोल इंडियाच्या अपेक्स जेसीसी बैठकीमध्ये दि. 22 जानेवारी 2021 रोजी हा प्रमुख विषय व अन्य प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात आल्यानंतर विवाहित मुलींना वेकोलीत नोकरी देण्याचा निर्णय वेकांलि मुख्यालयाने दि. 16 नोव्हेंबर 2021 रोजी निर्गमित केलेल्या पत्राव्दारे लागु करण्याचे निर्देश वेकोलिच्या सर्व क्षेत्राीय कार्यालयांना दिले आहेत.
हंसराज अहीर यांनी वेकोलि मुख्यालयात या प्रश्नी दि. 02 मार्च 2021 व 23 सप्टेंबर 2021 रोजी बैठक घेवून वरीष्ट अधिकाऱ्यांना कोल इंडिाया व्दारा घेतलेल्या निर्णयावर तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. अखेर हा निर्णय लागु करण्यात आल्याने प्रकल्पग्रस्त बांधवांच्या गत अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश मिळाले आहे. वेकोलिमध्ये महिलांना संपूर्णतः नोकरी नाकारण्यात आली होती परंतू विधवा व अविवाहित महिलांना नोकरी देण्यात यावी यासाठीही हंसराज अहीर यांनी आपल्या संसदीय कार्यकाळात सफल प्रयत्न केल्याने त्यांच्यामुळेच भूमिअधिग्रहणा वेळी व सातबारा मध्ये नावाची नोंद असलेल्या महिलांना तसेच वडीलांच्या नावावर अविवाहित मुलींना सुध्दा नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता हे इथे उल्लेखनिय!
वडिलांच्या मालमत्तेत आश्रीत म्हणुन विवाहित महिलांना नोकरीची संधी देण्यात यावी ही भूमिका अहीरांनी सातत्याने घेतली. वेकोलि मुख्यालयाच्या प्रत्येक बैठकीत हा मुद्दा उपस्थित करीत सदर्हु प्रस्ताव वरीष्ठांकडे सादर करण्याच्या सुचना त्यांनी वेळोवेळी केल्याने या मागणीची ग्राह्यता विचारात घेत अखेर कोल इंडीयाने हा प्रश्न मार्गी लावला व त्यावर अंमलबजावणी सुध्दा सुरू केली आहे. अहीर यांच्या आग्रही भूमिकेमुळेच हे अभूतपूर्व यश मिळाल्याची सार्वत्रिक भावना वेकोलि प्रकल्पग्रस्तांमध्ये व्यक्त होत आहे. मधुमेही, उच्चरक्तदाब असणारे सुध्दा नोकरीस पात्रा ठरविण्याचा निर्णय झालेला आहे. अन्य प्रकरणात विविध कारणांनी अयोग्य घोषित केलेल्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांना शारिरीक पात्रातेनुसार वेकोलित सामावून घेण्याचा प्रस्तावसुध्दा कोल इंडिाया बोर्ड मध्ये वेकोलि मुख्यालयाच्या माध्यमातून दाखल झालेला आहे, यावर लवकरच सकारात्मक निर्णय अपेक्षीत असल्याचे हंसराज अहीर यांनी म्हटले आहे. हंसराज अहीर यांनी या निर्णयाबद्दल मा. प्रधानमंत्राी नरेंद्र मोदीजी, केंद्रीय कोळसा मंत्राी व इतरांचे आभार मानले आहे.Hansraj Ahir -Of project victims has Rights to work for married girls in WCL
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment