Ads

गडचांदूर पोलीसांची नांदाफाट येथील एका ट्रांस्पोर्ट कंपनीवर धाड. गडचांदूर पोलीसांची नांदाफाट येथील एका ट्रांस्पोर्ट कंपनीवर धाड.


Gadchandur police raid a transport company in Nandafhat.

गडचांदूर प्रतिनिधी:- बायोडिझेल प्रकरण सध्या अख्ख्या महाराष्ट्रात गाजत आहे.याच पार्श्वभूमीवर गडचांदूर पोलीसांनी 24 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास कोरपना तालुक्यातील नांदाफाटा येथे एका ट्रांस्पोर्ट कंपनीच्या आवारातील डिझेल साठ्यावर धाड टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी 'कथित बायोडिझेलची' हेराफेरी होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सदर धाड टाकण्यात आल्याची माहिती आहे.
या ट्रान्सपोर्ट कंपनीकडे सिमेंट उद्योगातील कच्चा माल ने-आण करण्यासाठी अंदाजे 100 हुन अधिक मोठमोठे बल्कर वाहन आहे.यासाठी जिल्ह्याच्या दुसऱ्या टोकावरील 100 किमी अंतरावर असलेल्या वरोरा येथील एका डिझेल पंपावरून दोन टँकर याठिकाणी आले होते.दोन टँकरपैकी एका छोट्या टँकरला कुठलाही वैध परवाना नसल्याचे कळते.बंडू श्रीहरी भोयर रा.नंदोरी व प्रणेश दिपक माले वरोरा (पेट्रोल पंप मालक)अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून दोन टँकर व अंदाजे साडे 3 हजार लिटर डिझेल असा एकुण 25 लाख 22 हजाराचा माल पोलीसांनी जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.सदर डिझेल हा बायोडिझल असल्याचे स्पष्टपणे सांगता येत नसून यासाठी लॅब मध्ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक,ठाणेदार सत्यजीत आमले यांच्यासह पोलीस पथकने सदर कारवाई केली असून डिझेलचे नमुने घेण्यात आले आहे.सदर ठिकाणी महसूल अधिकार्‍यांची उपस्थिती होती.पुढील तपास ठाणेदार आमले करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment