पोंभूर्णा दुर्योधन घोंगडे : येथे बऱ्याच शेतोपयोगी पाळीव जनावरांना अज्ञात आजाराची लागण झाली असून, आतापर्यंत परिसरात या रोगाची लागण झालेल्या अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. या भागात जनावरांना काही दिवसापूर्वी मोठ्या मुस्कीलीने चौखुर्या रोगाची लागण झाल्याने लसीकरण करण्यात आले होते. त्यामुळे बऱ्यच जनावरांना लसीकरण झाल्यावरही जनावरे दगावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. याकडे पशु वैद्यकीय यंत्रणा अजिबात लक्ष देत नसल्याने अज्ञात आजाराने ग्रस्त असलेल्या जनावरांना वेळेवर उपचार मिळत नसल्याची तक्रार केली जात आहे. आधीच दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या शेतकºयांसमोर हे नवीन संकट उभे राहिल्याने बळीराजा पशुपालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या भागातील शेतकरी वर्गाचा शेतीव्यवसायाला जोडधंदा म्हणून काही शेतकरी बांधव कडून दुधाळ जनावरे पाळली जात आहेत. बºयाच शेतकरीवर्गाचे सध्या दुष्काळात दुग्ध व्यवसाय अर्थार्जनाचे साधन बनले आहे.गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून या भागातील पाळीव जनावरांना सध्या ताप येऊन लागण झालेले जनावर चारा, पाणी पिणे, चारा खाणे बंद करते व तर काही वासरू बैल हार्ट अट्याक आल्यागत अवघ्या पाच मिनटात किंचाळून लगेच त्याचा मृत्यू होत असल्याची माहिती नुकसानग्रस्त बळीराजांकडून मिळत आहे. लागण झालेल्या काही जनावरांना लसीकरणसुद्धा केले, तरीही जनावरांचा मृत्यू झाला आहे तर काही शेतकºयांनी औषधोपचारास विलंब होत असल्याने जनावरांना मृत्यूला सामोरे जावे लागत असल्याची खंत व्यक्त केली आहे. मृत्यू पावलेल्या जनावरांमध्ये काही वासरू, दुधाळ जनावरे व बैलांचा समावेश असून, या रोगामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांना लाखों रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. दुष्काळात या आजारामुळे जिवापाड जपलेल्या जनावरांचा डोळ्यासमोर मृत्यू पाहण्याचा दुर्दैवी योग शेतकºयावर आला आहे. शेतमालास कवळी मोल भाव त्यातच हातात आलेल्या पिकांवर अकाली पाऊसाने हजेरी लावून शेकर्यांचे कंबरडे मोडले असताना मेताकुटीस आलेल्या शेतकऱ्यांची नुकसान झाली असून दुष्काळाच्या झळा यामुळे आधीच बळीराजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. सुशी दाब गाव व परिसरातील गावात अज्ञात आजाराने थैमान घातले असून आजाराने अनेक जनावरे दगावत आहेत. मात्र तालुक्यातील जबाबदार अधिकाºयांकडून कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचे चित्र या भागात पहावयास मिळत असून पशुवैद्यकीय यंत्रणाच जणू शोभेची वास्तू बनली आहे. या भागात जनावरे दगावत असताना स्थानिक एक कर्मचारी लसीकरणाची जवाबदारी पार पाडत आहे. तर गोरगरीब शेतकऱ्यांकडून ज्यादा पैसे घेत असल्याचे समजते.
तरी या आजाराचे निदान करण्याचे हेतूने जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी वर्गाने तात्काळ लक्ष वेधून उपाय योजना करावी व तालुका यंत्रणेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांत केली जात आहे.
0 comments:
Post a Comment