Ads

लाखभर पोस्टकार्डावर संविधानाची उद्देशिका परमानंद तिराणिक यांचा उपक्रम

Parmanand Tiranik's initiative on the objective of constitution on one lakh postcards
भद्रावती (तालुका प्रतिनिधी ):-संविधानाची उद्देशिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विस्मृतीत चाललेल्या पोस्टकार्डचा उपयोग करण्याचा उपक्रम वरोरा येथील कलाशिक्षक परमानंद तिराणिक यांनी राबविला आहे. तब्बल एक लाख पोस्टकार्डावर भारतीय संविधानाची उद्देशिका लिहून ती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य ते करीत आहेत, तिराणिक हे आदिवासी कला संवर्धन समितीचे जिल्हाध्यक्ष आहेत.
अलीकडे पोस्टकार्डाचा वापर नगण्य स्वरूपात केला जातो मात्र, काहिसे अडगळीत पडलेले हे माध्यम निवडून त्याचा उपयोग संविधानाचा प्रसार करण्यासाठी करण्याचा निश्चय तिराणिक यांनी केला. त्यासाठी स्वहस्ताक्षरात त्यांनी ही उद्देशिका पोस्टकार्डावर लिहून काढली आहे. व ही पोस्टकार्ड ग्रामीण भागात पोहोचविली गेलीत.
भारतीय संविधानाची उद्देशिका राज्यातील पहिली ते बारावीच्या प्रत्येक विषयाच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे. देशात २०१५ पासून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र हा उपक्रम केवळ शासकीय स्तरावर मर्यादित न राहता त्याचा मोठ्या प्रमाणात विचार होणे गरजेचे आहे. त्यासाठी पोस्टकार्डावरील सचित्र संविधानाचा हा उपक्रम राबविण्यात आला आहे असे तिराणिक यांनी सांगितले. भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान इतर लोकप्रतिनिधी, सरपंच यांना ही पोस्टकार्ड पाठविली आहेत. याशिवाय व्हाँट्सअँप गृपमधील सदस्यांच्या मदतीने या पोस्टकार्डाचे वितरण केले. ही एक लाख पोस्टकार्ड विकत घेणे, लिखाणासाठी रंगीत पेन घेणे असा सगळा खर्च तिराणिक यांनी केला आहे. याशिवाय इतरांनाही हा आर्थिक भार उचलला. लाँकडाऊनमुळे मागील वेळेस डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करता आली नाही. त्यामुळे, पोस्टकार्डाच्या माध्यमातून संविधानाचा उद्देश लोकांपर्यंत पोहचविण्याची संकल्पना परमानंद तिराणिक यांना सुचली. एका पोस्ट आँफिसमधुन ही कार्ड विकत मिळत नव्हती. त्यामुळे, विविध पोस्ट कार्यालयातून ही कार्ड विकत घेऊन ती लोकांना पाठविण्यात आली. अनेकांनी या कामी मदत केल्याचेही तिराणिक म्हणाले लवकरच गिनीज बुक आँफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही नोंद होणार असल्याचे त्यांनी सांगितले...
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment