भद्रावती :-नगर परिषद भद्रावती च्या जागेवर बांधण्यात आलेल्या राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण बाबत नगर परिषद प्रशासनाने संपूर्ण त्रुटींची पूर्तता केल्यानंतर सुद्धा युती शासनाद्वारे पुतळा अनावरण ची परवानगी जवळपास सहा वर्षांपासून दिल्या जात नव्हती. याबाबतीत शासनाद्वारे सातत्याने अन्याय होत होता. या अन्यायाविरुद्ध पेटून उठून तत्कालीन आमदार बाळू धानोरकर यांनी शासनाच्या अनावरणाच्या बाबतीतली कोणत्याही परवानगीची वाट न पाहता स्वतःच महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले.
महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण दिनांक 26 नोव्हेंबर 2015 ला दुपारी अडीच वाजता करण्यात आले. दुधाने राज्याभिषेक करण्यात आला. 26 नोव्हेंबर 2021 ला याच घटनेला सहा वर्ष होत आहे. इतकी वर्ष लोटूनही तत्कालीन आमदार बाळू धानोरकर यांनी सत्तेत असूनही विरोध पत्करून केलेले धाडस आजही भद्रावती करांच्या स्मरणात आहे.
26 नोव्हेंबरला दुपारी अडीच वाजता अनावरण होताच राज्य शासन खडबडून जागे झाले. त्याच दिवशी रात्री नऊ वाजता पुतळ्याच्या अनावरण याची रीतसर परवानगी सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने पाठविण्यात आली.
पुतळ्यास कार्योत्तर मान्यता प्रदान करण्याचे पत्र 26 नोव्हेंबर 2015 ला रात्री प्राप्त झाले.
सत्यता असूनही एखाद्या कामाला जाणीवपूर्वक विरोध होत असेल तर जनसामान्यांसाठी हा विरोध झुगारुन व भविष्यातील परिणामांची कोणतीही पर्वा न करता कशा प्रकारे निर्णय घ्यायचा असतो हे त्यावेळी तत्कालीन आमदार बाळू धानोरकर यांनी दाखवून दिले होते.
महाराजांचा पुतळा बांधल्यापासून जवळपास सहा वर्ष हा पुतळा कपड्यात गुंडाळून ठेवण्यात आला होता. याबाबत नागरिकांमध्ये कमालीचा रोष होता. जवळपास चार वेळा कपडा बदलविण्यात आला होता.
सहसचिव नगर विकास
विभाग व कक्ष अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई या दोन विभागांची ना हरकत प्रमाणपत्र मिळणे बाकी होते. अन्य अकरा पैकी नऊ परवानग्या मिळाल्या होत्या.
तत्कालीन नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी स्वतः जाऊन दोन्ही विभागाच्या सचिवांची सातत्याने भेट घेतली होती व त्रुटींची पूर्तता केली होती. तसेच आमदार झाल्यानंतर बाळू धानोरकर यांनी एक वर्ष या बाबीचा पाठपुरावा केला. पूर्ण त्रुटींची पूर्तता केल्यानंतरही परवानगी न मिळाल्याने हे पाऊल उचलणे भाग पडले असे आमदार बाळू धानोरकर यांनी सांगितले.
सव्वीस तारखेला मंत्रालयाचे कामकाज आटोपल्यानंतर सुद्धा रात्री नऊ वाजता मंत्रालय उघडून सदर उर्वरित दोन परवानग्या पाठविण्यात आल्या होत्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहसचिव नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई व कक्ष अधिकारी सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई या दोघांचेही ना हरकत प्रमाणपत्र 26. 11 .2015 ला नगरपरिषद प्राप्त झाले होते. या प्रसंगी कोणत्याही स्तरावर जाऊन काम पूर्णत्वाला नेणारा नेता म्हणून बाळू धानोरकर यांची ओळख जनसामान्य झाली होती.
न.प. भद्रावतीच्या हुतात्मा स्मारक येथील संग्रहालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारणार
नगर परिषद भद्रावती येथे हुतात्मा स्मारक येथे येथील संग्रहालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनपटावर विषयीची माहिती सुद्धा रेखाटण्यात येणार आहे. तसेच शक्य झाल्यास या संग्रहालयाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नावही देण्यात येणार आहे. येत्या वर्षात सदर काम पूर्ण होण्याची शक्यता असून या संपूर्ण कामाला 25 लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे न.प. द्वारे सांगण्यात आले.
0 comments:
Post a Comment