मुल(दुर्योधन घोंगडे):-राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री श्री. प्राजक्त तनपुरे हे चंद्रपूर दौऱ्यावर असताना मुल येथील राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बल्लारपूर विधानसभा क्षेत्र कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कार्यालयात मंत्री महोदय यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी तालुक्यातील असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते कार्यालयात हजर होते.
याप्रसंगी मंत्री महोदया सोबत राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी वैद्य , महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, युवक चे जिल्हाध्यक्ष नितीनजी भटारकर उपस्थित होते. सदर भेटीत मूल तालुक्यातील समस्त शेकडो च्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते ह्यांनी मंत्रीमहोदयांचे उत्साहाने जल्लोशात स्वागत केले. कार्यकर्त्यांचे पक्ष हिताचे मनोबल वाढवीण्या करिता सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जोमाने कामाला लागावेत अशा सूचना मंत्रिमहोदयांनी दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव कार्यकर्त्यां सोबत पाठीशी राहील असा मौलिक सल्ला उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस चे बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीत सुरेशराव समर्थ ह्यांचे पक्ष वाढि करिता प्रयत्ना बाबत प्रशांसा करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मंत्री महोदयांनी कार्यकर्त्यांचे अडचणीचे निवेदन स्वीकारून तात्काळ थेट संबंधित अधिकाऱ्यांसोबत दूरध्वनी द्वारे चर्चा करून सदर अडचण सोडविण्याचा प्रयत्न करून कार्यकर्त्यांना न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न केला.
सदर कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी कांग्रेस चे शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, तालुका कार्याध्यक्ष गुरदास गिरड कर, शहर कार्याध्यक्ष महेश जेंगठे, महिला तालुका अध्यक्ष निताताई गेडाम ,युवक चे तालुका अध्यक्ष समीर अल्लूरवार , प्रा, प्रभाकर धोटे, प्रशांत भरतकर, साईनाथ गुंडोजवार, अशोक मार्गनवार, संदीप तेलंग , राजू कोवे, मारोती शेंडे,नवनीत चिंचोलकर, संदेश भोयर , वैभव गांगरेड्डीवार,सुमीत मेश्राम ,वैभव भोयर आदि बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment